Annapoorani चित्रपटात प्रभू श्रीराम यांचा अपमान
शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे (Annapoorani). या चित्रपटातील बऱ्याच दृश्यांवरून आणि संवादांवरून नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. यामध्ये प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं म्हटलं गेलंय. त्यावरून नयनतारा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. हा वाद नंतर इतका वाढला की नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून या चित्रपटाला काढून टाकण्यात आलं. आता स्वत: नयनताराने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित माफी मागितली आहे (Nayanthara Breaks SILENCE on Annapoorani Controversy, Issues Apology: ‘Jai Shri Ram’).
नयनताराने या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय की ती स्वत: मंदिरात देवदर्शनासाठी जाते आणि देवावर तिची खूप श्रद्धा आहे. जे काही झालं ते नकळत झाल्याचं तिने म्हटलंय. नयनताराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टच्या सुरुवातीलाच ‘जय श्रीराम’ असं लिहिलं आहे (Nayanthara says ‘Jai Shri Ram’, issues apology for ‘Annapoorani’). त्यानंतर तिने पुढे म्हटलंय, ‘मी अत्यंत जड अंत:करणाने आणि सत्याच्या आधारावर ही पोस्ट लिहित आहे. माझ्या अन्नपूर्णी या चित्रपटामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, त्याविषयी मला सर्व देशवासियांना संबोधित करायचं आहे. कोणताही चित्रपट केवळ आर्थिक लाभासाठी नाही तर त्याच्याशी निगडीत संदेश देण्यासाठी बनवला जातो. अन्नपूर्णी या चित्रपटाविषयी मी इतकंच सांगू शकते की त्याच्याशी संबंधित भावना आणि कष्ट हे केवळ निरागस मनाने घेतले होते. आयुष्याचा प्रवास त्यात प्रतिबिंबित करता यावा आणि प्रबळ इच्छाशक्तीने अडथळे पार करता यावेत हाच त्यामागचा उद्देश होता.’
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘चित्रपटातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना आमच्याकडून नकळत प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आणि सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळवलेला आमचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचा माझा किंवा माझ्या टीमचा हेतू अजिबात नव्हता.’
‘कोणाच्याही भावना दुखावण्याचं कृत्य माझ्या विचारांतही नाहीत. कारण मी स्वत: अशी व्यक्ती आहे, जिची देवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि देशभरातील मंदिरांना मी भेट देत असते. या प्रकरणाचं गांभीर्य समजून मी ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची मनापासून माफी मागते. अन्नपूर्णी या चित्रपटामागील आमचा उद्देश हा उन्नती आणि प्रेरणा देण्याचा होता. कोणाचंही मन आम्हाला दुखवायचं नव्हतं. गेल्या दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास हा एकच उद्देश पूर्ण करण्यासाठी आहे, तो म्हणजे.. एकमेकांकडून शिकणं आणि सकारात्मकता वाढवणं’, असं तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.
Nayanthara Jai Shri Ram apology Annapoorani
Nayanthara Jai Shri Ram apology Annapoorani
Nayanthara Jai Shri Ram apology Annapoorani
Nayanthara Jai Shri Ram apology Annapoorani
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements