Farmers Protest : Nationwide Bharat Bandh Called By United Kisan Morcha
संयुक्त किसान मोर्चाकडून येत्या 16 फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 16 फेब्रुवारीला सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. केंद्र सरकारने MSP बाबत कायदा करावा ही प्रमुख मागणी शेतकरी संघटनांची आहे. या बंदमध्ये देशभरातील शेतकरी, कामगार सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांनी आधी 13 फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेला जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता 16 फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा देण्यात आली आहे (Nationwide Bharat Bandh Called By United Kisan Morcha).
शेतकरी चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीमाभागात प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशभरातील शेतकऱ्यांना कॉर्पोरेट नीतींच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सर्वांना एकत्र एकाच मंचावर येण्याचं आवाहन केलं आहे.
पंजाबचे शेतकरी तब्बल 10 हजार ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसून हरियाणात दाखल होणार असल्याची घोषणा शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी शंभू बॉर्डर, डबवाली, खनौरी बॉर्डर यांची निवड करण्यात आली आहे. पण या तीनही सीमांना आता सील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सीमांवर आता पंजाब आणि हरियाणाच्या पोलिसांसह बीएसएफ आणि आरएएफचे जवान तैनात करण्याात आले आहेत.
दुसरीकडे पंजाबच्या शेतकऱ्यांना हरियाणा जाण्यापासून रोखण्यासाठी अंबालामध्ये कलम-144 लागू करण्यात आलं आहे. पंजाब आणि हरियाणाच्या दरम्यान संभू बॉर्डरवर सिमेंटचे बॅरिकेटींग करुन त्यावर काटेरी ताऱ्यांनी सील करण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाने घग्गर नदीवर बांधलेला पूलही बंद केला आहे. पटियालापासून अंबाला येथे ये-जासाठी वापरला जाणारा रस्त्याची वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली आहे. सोनीपत, झज्जर, पंचकूला नंतर आता कैथल जिल्ह्यातही कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
Nationwide Bharat Bandh Called By United Kisan Morcha
Nationwide Bharat Bandh Called By United Kisan Morcha
Nationwide Bharat Bandh Called By United Kisan Morcha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements