हे महाराष्ट्रातील नाशिकला गोदावरीच्या किनाऱ्यावर असणारे घर आपोआप पडावे यासाठी सगळेच भारतीय कितीतरी वर्षे कष्ट घेऊन ह्या घराकडे साफ दुर्लक्ष करत होतेच. पण नियतीची ती इच्छा नव्हती… तिने ते पडू दिले नाही इतकी वर्षे, तिने ते जीवाचा आकांत करून जपले… शेवटी काल तिच्या नाकावर टिच्चून भारतीयांनीच हे घर पाडले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीची ज्योत जेथे पेटवली त्या नाशिकमधील अभिनव भारतचे कार्यालय असलेला वाडा अखेरीस शासनाने जमीन दोस्त केले आहे. अभिनव भारत स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी हा जुना वाडा तोडण्यात आला आहे.
नाशिक शहरातील दुर्गा मंगल कार्यालयाजवळ तीळभांडेश्वर लेन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत चळवळ ज्या वाड्यात चालवली होती त्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात येणार आहेत. 1899 ते 1909 या कालावधीत अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या गुप्त चळवळी चालवल्या गेल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाल्यानंतर चळवळीचे काम थंडावले होते.
हे घर साधे नव्हते…! भारताचा ब्रिटिशांविरुद्धचा ‘सशस्त्र क्रांतिकारी स्वातंत्र्यलढा’ ज्या घरातून सुरू झाला असे खुद्द ब्रिटिशांनी लिहून ठेवले ते घर भारतीयांना सांभाळता आले नाही हे केवळ निंदनीय…! ‘आई आई देवाने दिले पण कर्माने नेले’ हेच भारतीयांबाबतचे कटू सत्य…!
हे घर वाचावे ह्यासाठी खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हातारवयात कष्ट घेऊन, भाषणे देऊन पैसा गोळा केला आहे. भारतीयांनी तात्यांच्या त्या कष्टाचे चांगलेच पांग फेडले आहेत असेच म्हणावे लागेल. शाब्बास भारतीयांनो…!
इथे ₹ 6 कोटी खर्च करुन नवीन स्मारक उभारणार आहेत असे म्हणतात…! पण कोणाचीही आई गेल्यावर तिचा सोन्याचा नाही अगदी प्लॅटिनमचा जरी हिरेजडित पुतळा बसवला तरी त्याने खरी जिवंत आई मिळत नसते. भारतीयांच्या ह्या कर्तृत्वाचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे…!
कर्तृत्ववान माणसांनी भारतात जन्म घेऊ नये आणि जन्म झालाच तर जमेल तेवढ्या लवकर आणि जमेल त्या मार्गाने भारत सोडावा हेच खरे…!
भारतात पूर्वीसारख्या कर्तृत्ववान माणसांनी जन्म घेणे का थांबवले आहे ह्याचे कारण म्हणजे ही घटना…!
© डॉ सुबोध नाईक
#Savarkar #India #hindu #british #nasik
Nashik Abhinav Bharat Mandir
Nashik Abhinav Bharat Mandir
Nashik Abhinav Bharat Mandir
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements