Mumbai Indians vs IND vs ENG Squad : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघात 16 खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघातील बहुतांश युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. कसोटी मालिकेच्या घोषणेनंतर मुंबई इंडियन्सने एक पोस्टर जारी केले, ज्याने चाहते संतापले आहेत.
🔒𝐈𝐍
Your thoughts on the squad, paltan? 🤔#OneFamily #INDvENG pic.twitter.com/lGreG3DeMU
— Mumbai Indians (@mipaltan) January 13, 2024
मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या खेळाडूंची पोस्ट केली आहे. फोटोमध्ये त्याने केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर आहेत. त्या फोटोमध्ये रोहित शर्माला दाखवलेले नाही. यामुळे चाहते चांगलेच संतापले असून त्यांनी आपला राग सोशल मीडियावर काढला आहे. IPL 2024 च्या लिलावानंतर मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्सची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींमध्ये केली जाते. रोहितने 2013 मध्ये पहिल्यांदा मुंबईचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्याने 168 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले, त्यापैकी 91 सामन्यात संघाने विजय मिळवला आणि 68 सामने गमावले.
IND vs ENG: Rohit Sharma Not On Mumbai Indians` Poster Revealing India Squad For England Test
Mumbai Indians vs IND vs ENG Squad
Mumbai Indians vs IND vs ENG Squad
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements