कपलचा ‘तो’ Video तुफान व्हायरल
मिठी मारली, अंगावर ब्लँकेट घेतलं अन्…; धावत्या दुचाकीवर नको ते चाळे….
प्रेमी युगुल कधी काय करतील याचा काहीच नेम नाही. सोशल मीडियावर तरुण तरुणींचे फिल्मीस्टाइल रोमान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात आता थंडीपासून वाचण्यासाठी एका जोडप्याने केलेला जुगाड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. एका कपलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ती तरुणी तिच्या प्रियकराच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. चालत्या स्कूटीवर तिने त्याला मिठी मारली. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक या कपलवर खूप टीका करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरवर वांद्रे बझ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा धोकादायक स्टंट करताना कपलने शाल घेतली आहे. त्यांच्या या कृतीवर संतप्त झालेल्या लोकांनीही रोड सेफ्टीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने स्कूटी चालवताना हेल्मेट घातलं नव्हतं. “वांद्रे रेक्लेमेशनमध्ये या साहसी कपलच्या स्कूटी राईडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई पोलीस, आम्ही तुम्हाला विनंती करतो की रस्त्यावरील प्रत्येकाची सुरक्षा सुनिश्चित करा” असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
This daring duo was spotted at Bandra Reclamation, turning heads with their unconventional scooter ride. @MumbaiPolice we kindly request your attention to ensure everyone's safety on the roads. 🛵 pic.twitter.com/mKrqCILXog
— Bandra Buzz (@bandrabuzz) January 13, 2024
लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने “हे लोक असं करून केवळ लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना माहीत आहे की अशा प्लॅटफॉर्मवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला जाईल आणि पोलिसांना टॅग केलं जाईल आणि त्यावर कारवाई देखील केली जाईल. या लोकांना फक्त चर्चेत राहायचं असतं” असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने लिहिलं आहे की, “पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी. हे रस्त्यावरील प्रत्येकासाठी धोकादायक आहे. याचा निषेध केला पाहिजे.” वर्दळीच्या रस्त्यावर अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दिल्लीच्या रस्त्यावर चालत्या स्कूटीवर कपल एकमेकांना मिठी मारताना दिसलं होतं. त्याचा व्हिडीओ गेल्या वर्षी चांगलाच व्हायरल झाला होता.
Video shows Mumbai couple romancing on moving scooter
Watch | Mumbai Couple’s Scooter Romance in Bandra Sparks Outrage, Netizens Call for Action
Mumbai Couple Scooter Romance in Bandra Video
Mumbai Couple Scooter Romance in Bandra Video
Mumbai Couple Scooter Romance in Bandra Video
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements