मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचे समर्थक सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात एकमेकांशी भिडताना पाहायला मिळाले. या घटनेशी संबंधित Video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात नेत्यांमध्ये एका मुद्द्यावरून वाद सुरू झाला, पुढे या वादाचं रुपांतर शिवीगाळ आणि मारामारीत झालं.
प्रवक्ते शहरयार खान आणि प्रदीप अहिरवार यांच्यात हा वाद झाला. व्हिडीओमध्ये हे दोघं एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. एकाने दुसऱ्याला धक्का दिल्यावर तो खाली पडला. त्यानंतर दुसऱ्याने त्याला मारण्यासाठी खुर्ची उचलली. काही लोक हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. याच दरम्यान एकमेकांना शिवीगाळही केली.
कमलनाथ जी समर्थक द्वारा दिग्विजय सिंह जी को गाली बकने को लेकर पीसीसी में जमकर चले लात-ठूँसे…
कुर्सियाँ चली , जमकर एक दूसरे को गालियाँ बकी गई…
बीचबचाव करने आये कमलनाथ समर्थक एक नेता को भी लात-ठूँसें पड़े… pic.twitter.com/wtWQ0sFsWp
— Narendra Saluja (@NarendraSaluja) January 29, 2024
प्रदीप अहिरवार यांच्यावर आरोप करताना शहरयार खान म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाबाबत प्रदीप हे दिग्विजय सिंह यांना शिवीगाळ करत होते. 17 नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा सत्ता मिळवली. काँग्रेसच्या पराभवासाठी कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांना जबाबदार धरण्यात आलं. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
MP Congress Leaders Fight Viral Video Election
MP Congress Leaders Fight Viral Video Election
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements