लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच
महाराष्ट्र : शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी राज्यात काही अपवाद वगळता काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली नव्हती. पण लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. पक्षातील आणखी काही नेतेही काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना तर अजित पवार यांच्या बंडातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. या तुलनेत राज्य काँग्रेसमध्ये गेल्या 5 वर्षात मोठी फूट पडलेली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. अमरिश पटेल, चंद्रकांत रघुवंशी आदी नेते पक्ष सोडून गेले. पण शिवसेना वा राष्ट्रवादीप्रमाणे राज्य काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडलेली नाही.
पक्ष सोडणार म्हणून अनेक नेत्यांची नावे समोर आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत नेहमीच संशय व्यक्त करण्यात आला. अर्थात, प्रत्येक वेळी अशोक चव्हाण यांनी पक्षांतराचा इन्कार केला व अफवा असल्याचा दावा केला होता. एकनाथ शिंदे सरकारवरील बहुमत सिद्ध करण्याच्या मतदानाच्या वेळी अशोक चव्हाण व त्यांचे सहा-सात समर्थक आमदार उपस्थित नसल्याने संभ्रम वाढला होता. अमित देशमुख यांच्याबाबतही अशाच वावड्या उठल्या होत्या. पण पक्षात मोठी फूट पडली नव्हती.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत येणार असे चित्र निर्माण झाले. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) याबरोबर काँग्रेस नेत्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. राजकीय भवितव्याची काळजी असलेल्या काही नेत्यांना भाजपचे आकर्षण वाटू लागले आहे. काँग्रेसमधील काही नेते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असल्याचे विधान मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची संधी नसल्याने त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा मार्ग पत्करला. त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा अथवा राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील काही नेते कुंपणावर आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकतर्फी यश मिळाल्यास राज्य काँग्रेसमधील काही बडे नेतेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जाते.
Milind Deora Quits Congress, Will Join Eknath Shinde-Led Sena
Milind deora resigns from congress, ends ’55-year relationship’
Milind Deora Resigns From Congress
Milind Deora Resigns From Congress
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements