पण एका चुकीमुळे सापडला. एक विचित्र प्रकार..
प्रेयसीसाठी काय करेल याचा नेम नसतो…
पंजाबच्या फरिदाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काय करेल याचा नेम नसतो. तसाच एक प्रकार उघड झालाय. प्रेयसी देत असलेली परीक्षा स्वत: देण्यासाठी बॉयफ्रेंडने हास्यास्पद प्रयत्न केला आहे. तो स्वत: आपल्या प्रेयसीसारखा पेहराव करुन परीक्षा केंद्रावर गेला होता. पण, एका चुकीमुळे तो पकडला गेला. प्रेयसी आरोग्य विभागातील एका पदासाठी परीक्षा देणार होती. पण, तिच्या जागी प्रियकरानेच परीक्षा देण्याचं ठरवलं.
यासाठी त्याने संपूर्ण तयारी केली होती. कपडे आपल्या प्रेयसीसारखे घातले. टिकली लावली, लिपस्टिक लावली, बांगड्या घातल्या. इतकेच नाही तर त्याने ओखळपत्र म्हणून खोटे आयडी कार्ड आणि आधारकार्ड देखील बनवून घेतले होते. अंग्रेज सिंग असं प्रियकराचं नाव असून आपली प्रेयसी परमजीत कौर याच्यासाठी त्याने हा जुगाड केला होता. जेव्हा तो परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याला बायोमॅट्रिक डिव्हाईसमध्ये फिंगरप्रिंट देण्यास सांगण्यात आले. यावेळी मात्र तो फसला आणि सगळा प्रकार समोर आला. परमजीत हिचा परीक्षेसाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
फरीदकोटच्या परीक्षा केंद्रावर अंग्रेस सिंगने प्रेयसीचं रुप घेऊन अधिकाऱ्यांना चकवण्याचा प्रयत्न केला. पण, तो फसला आहे. यासंदर्भातील फोटो व्हायरल होत आहेत. ७ जानेवारीला कोटकपुराच्या डीएवी पब्लिक स्कूलमध्ये बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेजमध्ये पॅरा मेडिकल भरतीसाठी परीक्षा होत होती. अंग्रेज सिंगने आपल्या प्रेयसीच्या जागी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. अंग्रेस सिंह परीक्षा केंद्रात गेला. त्याला पाहूनच अधिकाऱ्यांना शंका आली होती. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली तर त्याने खोटे आधार कार्ड आणि मतदान कार्ड दाखवले. अधिकाऱ्यांनी त्याची बोटं बायोमेट्रिक डिव्हाईसवर लावले तेव्हा सत्य समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणात तक्रार दाखल केली आहे.
Punjab man dresses as girlfriend to write test on her behalf; caught
Punjab man disguises as woman to write girlfriend’s exam
man dresses as girlfriend to write exam
man dresses as girlfriend to write exam
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310