कर्नाटक—belgavkar : बेंगळुरु येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वारंवार तपासणी करण्यास सांगितले गेल्याने चिडून कोचीला जाणाऱ्या एका प्रवाशाने विमानतळावर ‘माझ्याकडे बॉम्ब आहे की चाकू…?’ असे शब्द उच्चारले (Bengaluru’s Kempegowda International Airport). त्याबरोबर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले आणि नंतर ताकीद देऊन सोडून दिले (Man detained at Bengaluru airport for uttering ‘bomb’ during security check). रविवारी नियमित तपासणीनंतर साजू के. कुमारन या प्रवाशाला विमानात चढण्याची परवानगी दिली, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याची हँडबॅग पुन्हा तपासायची होती म्हणून उतरवले.
त्यामुळे चिडलेल्या 38 वर्षीय कुमारन याने ‘माझ्याकडे बॉम्ब आहे की चाकू…? असा प्रश्न केला. यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत विमानतळ पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर कुमारन यांने विनंती केली की, त्याच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याला त्याच्या मूळ गावी थ्रिसूरला (केरळ) जावे लागते आहे. तेव्हा त्याला पुन्हा विमानामध्ये बसण्याची परवानगी दिली. परंतु जेव्हा या प्रकरणाच्या चौकशीसाठी गरज असेल, तेव्हा त्याला उपस्थित राहण्यास सांगितले गेले जाईल. तसेच त्याला ताकीद दिली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी कुमारन याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
Man detained at Bengaluru airport for uttering bomb
Man detained at Bengaluru airport for uttering bomb
Man detained at Bengaluru airport for uttering bomb
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements