भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL – Bharat Petroleum Corporation Limited) ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ‘प्युअर फॉर शुअर’ असे नाव त्याला देण्यात आलंय. यानुसार आता बीपीसीएलचे एलपीजी सिलिंडर ज्यावेळी ग्राहकाच्या घरी पोहोचते केलं जाईल त्यावेळी ते सील प्रूफ असेलच. याशिवाय त्यावर आता क्यूआर कोड देखील असणार आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच सेवा आहे (BPCL launches “Pure for Sure” LPG initiative with QR code authentication).
बीपीसीएल कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलिंडरची गुणवत्ता आणि त्याच्या प्रमाणाची हमी देण्यासाठी ही नवी सुविधा आणली आहे. ग्राहकाच्या घरी देण्यात येणाऱ्या सिलिंडरवर छेड छाड प्रूफ सील असेल. तर, क्यूआर कोड देखील असेल. या क्यूआर कोडमध्ये सिलिंडरची सर्व माहिती असणार आहे (BPCL’s Bharatgas launches initiative to ensure quality & quantity in LPG cylinders). गेली काही महिन्यापासून सिलेंडरमधील गॅस काढून त्याचा काळाबाजार करण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत कंपनीकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होतंय. तसेच कमी वजन भरल्यामुळे ग्राहक आणि कमर्चारी यांच्यात वाद निर्माण होत होता. त्यावर उपाय म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे.
QR कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह एक खास प्युअर फॉर शुअर पॉप-अप दिसेल. यावर सिलिंडर संबंधित सर्व तपशील पॉप-अपमध्ये उपलब्ध असणार आहे. सिलेंडर भरताना त्याचे एकूण वजन किती होते? सील चिन्ह होते की नाही इत्यादी माहिती यामधून मिळणार आहे. ग्राहकांनी सिलेंडरची डिलिव्हरी स्वीकारण्यापूर्वी त्यांचे सिलिंडर सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी याची फार मोठी मदत होणार आहे. सिलिंडरच्या सीलमध्ये काही छेडछाड झाली असेल तर QR कोड स्कॅन होणार नाही. ज्यामुळे पुढील वितरण थांबेल अशी माहितीही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एलपीजी इकोसिस्टममध्ये काही जुन्या समस्या आहेत. ट्रांझिटमध्ये चोरी, अपेक्षित वितरण वेळेवर ग्राहक उपस्थिती नसणे, रिफिल डिलिव्हरीसाठी स्वतःची वेळ निवडणे, अशा समस्याचे निराकरण करण्यासाठी ही सुविधा आधील उपयुक्त ठरेल. तसेच, या एलपीजी इकोसिस्टममध्ये डिलिव्हरी वुमनचा समावेश करण्याचा मानस आहे. कारण याचा वापर महिलांपेक्षा अधिक कोणी जास्त करत नाही. त्यामुळे महिला कर्मचारी यासाठी नेमण्यात येणार आहेत असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
LPG initiative with QR code Bharatgas
LPG initiative with QR code Bharatgas
LPG initiative with QR code Bharatgas
LPG initiative with QR code Bharatgas
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements