2019 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती Loksabha
Loksabha Election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, 2019 च्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करू शकतो.
भाजपा आपल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नावांचा समावेश करू शकतो. 2019 मध्येही भाजपाने आपल्या पहिल्या यादीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांची उमेदवारी जाहीर केली होती. भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये पक्षाने आतापर्यंत कधीही न जिंकलेल्या आणि 2019 मध्ये अत्यंत कमी फरकाने जिंकलेल्या 164 जागांचाही समावेश असेल. गेल्या दोन वर्षांपासून भाजपाकडून अशा जागांवर लक्ष्य केंद्रित करून मेहनत घेतली जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 543 पैकी 436 जागांवर निवडणूक लढवली होती. तसेत त्यापैकी 303 जागांवर विजय मिळवला होता. तर 133 जागांवर भाजपाचा पराभव झाला होता. त्याबरोबरच पक्ष कमकुवत असलेल्या 31 जागा अशा मिळून 164 जागांची यादी करून केंद्रीय मंत्री आणि इतर बड्या नेत्यांकडे या जागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी घेतलेल्या नेत्यांमध्ये अमित शाह यांचाही समावेश आहे.
भाजपाने या जागांना सी आणि डी गटात विभागलं आहे. त्यात प्रत्येकी 80 जागांच्या दोन श्रेणी बनवण्यात आल्या आहेत. 45 मंत्र्यांकडे या जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक मंत्र्याकडे दोन किंवा तीन जागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये काही बड्या मित्रपक्षांनी भाजपाची सोडलेली साथ हे त्यामागचं महत्त्वाचं कारणं आहे (Loksabha Election Modi Shah BJP).
भाजपा 2019 मध्ये पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक या पक्षांना सोबत घेऊन लढला होता. मात्र आता या मित्रपक्षांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यामुळे या राज्यांत भाजपाला अधिकाधिक जागा लढता येतील. 2019 मध्ये भाजपाने पंजाबमधील 13 पैकी 3, महाराष्ट्रात 48 पैकी 25, बिहारमध्ये 40 पैकी 17 तर तामिळनाडूमध्ये 39 पैकी 5 जागांवर निवडणूक लढवली होती.
Loksabha Election Modi Shah BJP
Loksabha Election Modi Shah BJP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements