Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्यात आली आहे. गेल्या वर्षी मध्यप्रदेशमध्ये भाजप विधानसभेत पराभूत होईल, असा अंदाज असताना भाजपने तेथे एकतर्फी विजय मिळवला. मध्यप्रदेशमध्ये विजयासाठी जो फॉर्म्युला वापरण्यात आला होता. तोच फॉर्म्युला भाजपकडून आता लोकसभेसाठी देशभर वापरण्यात येणार आहे.
2023 मध्ये मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आधीच्या 2019 विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले होते. त्यासाठी निवडणुकीच्या दोन महिने आधीच पराभूत झालेल्या 164 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्याचा फायदा भाजपला झाला. आता तोच फॉर्म्युला लोकसभेसाठी वापरण्यात येणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ज्या 165 जागांवर पराभूत झाले. त्या जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे (Loksabha भाजप Formula).
पराभूत झालेल्या त्या 165 जागांवर आधीच उमेदवार जाहीर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यासाठी 30 जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. जर काही अडचणीमुळे यादी जाहीर होऊ शकली नाही तर, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यादीला अंतिम स्वरुप देण्यात येईल, अशी माहिती आहे. या पराभूत झालेल्या जागांच्या उमेदवारांच्या निवडी संदर्भातील 60 टक्के काम झाल्याची माहिती आहे.
साधारण पणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर सर्व पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. त्यामुळे प्रचाराला अवघा एक महिन्याचा कालावधी उमेदवारांना मिळेल. मात्र, भाजपच्या मध्यप्रदेश फॉर्म्युल्यामुळे त्यांच्या 165 जागांवरील उमेदवरांना दोन महिन्यांचा प्रचारासाठी कालावधी मिळेल. त्यामुळे उमेदवाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल. आणि उमेदवाराच्या विजयाची संधी वाढले, अशी शक्यता आहे.
Lok Sabha Election Modi BJP MP Formula
Lok Sabha Election Modi BJP MP Formula
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310