या खासदारांचं तिकीट कापणं निश्चित
कर्नाटकमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपाने खास फॉर्म्युलाही तयार केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून 70 वर्षांवरील खासदारांना तिकीट दिलं जाणार नाही. मात्र यामध्ये काही अपवादही असतील. मिळत असलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये भाजपा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. इथे भाजपाचे 25 खासदार आहेत. त्यामधील 11 खासदारांचं तिकीट यावेळी कापलं जाण्याची शक्यता आहे.
अनेक विद्यमान खासदारांनी विविध कारणांवरून निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपलं म्हणणं पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवलं आहे. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीरपणे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. तर जी. एम. सिद्धेश्वर आणि रमेश जिगाजिनागी हे वाढत्या वयामुळे निवडणूक लढवणार नसल्याचे समोर येत आहे. तर अनंत हेगडे यांनी आरोग्याबाबतच्या समस्यांचा हवाला दिला आहे. त्याशिवाय शिवकुमार उदासी यांनी निवडणूक न लढवण्यासाठी खासगी कारण समोर केलं आहे. बी. एन. बच्चे गौडा (82), मंगल सुरेश अंगडी (बेळगाव), जी. एस. बसवराज, व्ही. श्रीनिवास प्रसाद आणि वाय. देवेंद्रपा हे सुद्धा यावेळी निवडणूक लढवणार नाहीत.
तसेच तीन वेळपेक्षा अधिक वेळा जिंकलेल्या नेत्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे भाजपाकडून निश्चित करण्यात आले आहे. मात्र यासाठी काही अपवादही ठेवण्यात येणार आहेत. हाच फॉर्म्युला भाजपाकडून इतर राज्यांमध्येही अवलंबला जाऊ शकतो. दरम्यान, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेसुद्धा कर्नाटकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढावी, असा भाजपा नेतृत्वाचा आग्रह आहे. त्यामुळे निर्मला सीतारमन आणि एस. जयशंकर यांच्यासाठी उपयुक्त मतदारसंघाचा शोध घेतला जात आहे. सध्या निर्मला सीतारमन ह्या कर्नाटकमधून आणि एस. जयशंकर हे गुजरातमधून राज्यसभा खासदार आहेत.
Loksabha Election BJP Belgaum Mangal Angadi
Loksabha Election BJP Belgaum Mangal Angadi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements