लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा
कुणाला तोटा आणि कुणाला फायदा होणार
Lok Sabha Election : बहुजन समाज पक्षाला (BSP) इंडिया आघाडीत घेण्यावरून मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण याबाबत पक्षाच्या प्रमुख मायावती एकदाही वक्तव्य केलं नव्हतं. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मायावतींच्या समावेशाला आडकाठी केली होती. तर मायावतींनी अखिलेश यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यामुळे त्यांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.
मायावतींनी (Mayawati) अखेर आपली वाढदिवशी सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. त्यांनी मीडियाशी बोलताना भाजप (BJP) सरकारसह सर्व विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडत आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत बसपा कोणत्या आघाडी किंवा पक्षासोबत निवडणुकीत उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.
कोणत्याही पक्षासोबत आघाडी केल्यानंतर पक्षाच्या मतांची टक्केवारी कमी होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार पुर्ण ताकदीने सर्व विरोधी पक्षांसमोर उभे ठाकतील, असा विश्वास मायावतींनी व्यक्त केला. मायावतींच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील कुणाला तोटा आणि कुणाला फायदा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायावती यांना सोबत घेण्याबाबत काँग्रेस (Congress) आग्रही होते. पण अखिलेश यांनी खोडा घातला होता. मायावती इंडियामध्ये आल्या असत्या तर मतविभाजन टाळता आले असते. याचा थेट फटका भाजपला बसला असता, असे गणित काँग्रेसकडून मांडले जात होते. पण आता मायावतींच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिलेश आणि मायावती यांनी सातत्याने एकमेकांविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षे राज्यात लोकसभा निवडणुकीत एकत्रित येणार का, याबाबत उत्सुकता होती. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बसपाचा सुफडा साफ झाला होता. पण त्यांच्या मतांची टक्केवारी अजूनही लक्षणीय आहे. त्याचाच फायदा इंडिया आघाडीला घ्यायचा होता.
Lok Sabha Election Mayawati BSP
Lok Sabha Election Mayawati BSP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements