Lahore underworld don Ameer Balaj Tipu shot dead
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या धांदल संपते न संपते तोच एक मोठी बातमी पाकिस्तानात झळकली. लाहोरमधला सर्वात मोठा डॉन अमीर टीपू बलाज टक्रांवालाच्या मुलाच्या हत्येची. एका लग्नात त्याची हत्या करण्यात आली (Ameer Balaj Tipu, the son of Arif Amir, alias Tipu Truckanwala,). लाहोरचा किंग अशी ओळख असलेल्या ट्रकांवालाची मुलाची हत्या करण्यात आली. अमीर ट्रकांवाला कुटुंबातल्या चौथ्या वारसाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डमध्ये गदारोळ माजला आहे.
18 फेब्रुवारी 2024 ला लाहोरमध्ये (चंग एरिया) एक लग्न होतं. त्यात लाहोरचा सर्वात देखणा डॉन अमीर ट्रकांवाला आला होता. त्याचा सर्वात जवळचा मित्र हमजाच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नात तो आला होता. अमीर ट्रकांवाला त्याच्या खास मित्रांसह आणि त्यांच्या भावांसह एका टेबलसमोर बसला होता. त्याच्या चारही बाजूला त्याचे बॉडी गार्ड होते. तेवढ्यात एक माणूस ट्रकांवाला जवळ आला आणि त्याच्यासह सेल्फी काढण्याची विनंती केली. दुसऱ्या क्षणी त्याने लपवलेलं हत्यार काढलं आणि अमीरवर गोळीबार केला. त्यानंतर तातडीने गोळीबार सुरु झाला. सुरक्षा रक्षकांनी उत्तरादाखल गोळीबार केला. यात एक हल्लेखोर मारला गेला तर दुसरा पळाला. अमीरला गोळ्या लागल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
18 तारखेला ही घटना घडली. लाहोरच्या जिना रुग्णालयात अमीरचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक न्यूज चॅनलने ही बातमी दाखवली. पाकिस्तानच्या प्रत्येक न्यूज चॅनलवर निवडणुकीच्या बातम्या होत्या. मात्र नंतर याच बातम्या येऊ लागल्या. अमीर ट्रकांवालाने ‘ऐ खुदा जब तक जिंदगी मेरे लिये बेहतर है, मुझे जिंदा रख और जब मौत मेरे लिए बेहतर हो तो मुझे उठाले.’ हे स्टेटस त्याने ठेवलं होतं. त्याने या ओळी का लिहिल्या होत्या? याचाही शोध पोलीस घेत आहेत.
Lahore underworld don Ameer Balaj Tipu shot dead
Lahore underworld don Ameer Balaj Tipu shot dead
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements