जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : कोल्हापुर च्या वाडी रत्नागिरी या ठिकाणी श्री क्षेत्र जोतिबा हे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेस एप्रिल महिन्यात जोतिबा देवाची यात्रा भरते. त्यालाच चैत्र यात्रा म्हणून देखील ओळखले जाते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश अशा जिल्ह्यांतून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. गुढीपाडवा झाला की सर्वच भक्तांना वेध लागतात, ते जोतिबा चैत्र यात्रेचे. या यात्रेच्या निमित्ताने सारा जोतिबा डोंगर एकाच जयघोषात दुमदुमून जात असतो.
एप्रिलमध्ये होणारी चैत्र यात्रा (Jyotiba Chaitra Yatra) पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी स्पष्ट केले. येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेची पहिली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी जोतिबाच्या सरपंच सौ. राधा बुणे होत्या. जोतिबावरील अतिक्रमणे काढली जावीत तसेच मंदिरातील दर्शनरांगा, पोलिस बंदोबस्त, घाट रस्ते, वाहनतळ या विषयांवर चर्चा झाली. पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी यात्रेत ठेवण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचे शिस्तबद्ध पद्धतीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. देवस्थानचे अधीक्षक धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी नामदेव दांडगे, मनोज कदम, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे उपस्थित होते.
kolhapur jotiba temple yatra april
kolhapur jotiba temple yatra april
kolhapur jotiba temple yatra april
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310