Maharishi Valmiki Development Corporation Scam
- महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांची आत्महत्या
- Karnataka Minister Nagendra resigns over accusations of illegal transfer of govt money to private companies
- Karnataka illegal money transfer case:
- Karnataka Minister B Nagendra : death and a multi-crore scam
कर्नाटकातील महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाच्या मनी ट्रान्स्फर घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस सरकारची पहिली विकेट पडली आहे. कारण मनी ट्रान्स्फर घोटाळा हा या अनुसुचित जमाती विकास आणि क्रीडा मंत्री बी नागेंद्र यांच्या तोंडी सूचनेवरूनच झाला आहे (Minister of Youth Empowerment, Sports, and Tribal Welfare in the Government of Karnataka), अशी चिठ्ठी लिहून महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांनी आत्महत्या केली होती. त्यावरून कर्नाटकात विरोधकांनी रान उठवले. आता हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे.
महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री बी. नागेंद्र (B. Nagendra) यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी दिली होती. काँग्रेस सरकार अडचणीत येऊ नये; म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. आता बी. नागेंद्र यांनी राजीनामा दिला आहे.
महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाचे अधिकारी पी. चंद्रशेखर यांच्या आत्महत्येनंतर भाजपकडून काँग्रेस सरकार आणि मंत्री नागेंद्र यांच्यविरोधात आवाज उठवला आहे. विरोधी पक्षांकडून होणारे हल्ले आणि संभाव्य राजकीय परिणामांची चर्चा सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यासोबत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी मंत्री नागेंद्र यांचा राजीनामा घेणे योग्य होईल. चौकशीत ते निर्दोष आढळले, तर नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले. खर्गे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नागेंद्र राजीनामा द्यावा, अशी सूचना केली.
कर्नाटक सरकारच्या अख्यातरित असणाऱ्या महर्षी वाल्मिकी विकास महामंडळात ₹ 87 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यानंतर महामंडळाचे अधिकारी चंद्रशेखर यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या चिठ्ठीत काही राजकीय नेत्यांची नावेही नमूद असल्याचे सांगण्यात येते. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह काही कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.
Karnataka Minister Nagendra resigns
Karnataka Minister Nagendra resigns
Karnataka Minister Nagendra resigns
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements