धार्मिक कार्यक्रम vs राजकीय प्रचार
Ayodhya Ram Mandir कर्नाटक : मी हिंदूविरोधी नाही आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराला नंतर भेट देणार आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आमच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते २२ जानेवारी रोजी राज्यभरातील राम मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना करतील, असे त्यांनी सांगितले. मी रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होणार नाही. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. या विधानाविरोधात राज्यातील भाजप नेते मला हिंदूविरोधी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मी हिंदूविरोधी किंवा श्री राम विरोधी नाही.
२२ जानेवारीला अयोध्येतील भाजप नाटक मंडळाच्या प्रदर्शनानंतर मी अयोध्येत जाऊन राम मंदिराला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीरामांचे विरोधक म्हणून माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी त्या भेटीचे फोटो शेअर करणार असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि संघ परिवारातील नेत्यांनी मूर्ती स्थापनेच्या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय प्रचाराचा कार्यक्रम बनवल्याचे मी आधीच नमूद केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमापासून आम्ही दूर राहत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले (मुख्यमंत्री सिद्धरामय्या Ayodhya राजकारण).
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या भव्य सोहळ्यावरून देशातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत काँग्रेसने या सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपा नेते काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसत असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण ‘आदरपूर्वक नाकारत’ आहे. भाजपा आणि RSS निवडणूक फायद्यासाठी याचा वापर करत आहेत. हा एक राजकीय कार्यक्रम बनविण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. सर्व हिंदूंचा विश्वासघात केला जात आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा हा धार्मिक कार्यक्रम असून तो भक्तिभावाने आयोजित करायला हवा होता, पण त्याचे राजकीय प्रचारात रूपांतर झाले आहे, या शब्दांत सिद्धरामय्या यांनी हल्लाबोल केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी या सर्वांनी रामलल्लाच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. एका धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करून १४० कोटी भारतीयांचा अपमान करण्यात आला आहे. हा सर्व हिंदूंचा विश्वासघात आहे. हा एक धार्मिक कार्यक्रम असून तो भक्तिभावाने आयोजित करायला हवा होता, पण त्याचे राजकीय प्रचारात रूपांतर केले जात आहे. रामजन्मभूमी वादाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
Karnataka CM Siddaramaiah Says BJP Making Politics Out Of Ram Temple
We did not receive invitation for Ayodhya Ram Temple inauguration: Karnataka DCM
Karnataka CM Siddaramaiah Ayodhya Ram Mandir
Karnataka CM Siddaramaiah Ayodhya Ram Mandir
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements