Trinamool fields 4 candidates for upcoming Rajya Sabha elections
Rajya Sabha Election 2024 : West Bengal : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी देशभरात सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसने रविवारी 4 उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये पत्रकार सागरिका घोष यांच्यासह सुश्मिता देव, ममता बाळा ठाकूर आणि नदीमूल हक यांचा समावेश आहे (Who is Sagarika Ghose, journalist nominated by TMC for Rajya Sabha polls?).
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चार उमेदवारांमध्ये तीन महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर त्यांनी महिला मतदारांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. बंगालमध्ये ममतांच्या पक्षाला सहजपणे 4 जागा मिळू शकतात. तर एक जागा भाजपला मिळू शकते. देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तृणमूलकडून (TMC) ट्विटरवरून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली. सागरिका घोष (Sagrika Ghosh) या पत्रकार आणि लेखक असून त्यांना राजकीय बातमीदारीचा मोठा अनुभव आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांवर त्यांनी लेखनही केले आहे. त्या ममता बॅनर्जी यांच्या निकवर्तीय मानल्या जातात.
सुश्मिता देव या सध्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार होता. ममतांनी त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. सिलचार लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदारही होत्या. तर माजी खासदार ममता बाळा ठाकूर यांनाही राज्यसभेत पाठवले जाणार आहे. त्या बानगांवर मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी होत्या.
नदिमूल हक हे तृणमूल काँग्रेसचा मुस्लिम चेहरा मानले जातात. तसेच ममता बॅनर्जी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेत सध्या 13 सदस्य आहे. भाजप (93) आणि काँग्रेस (30) नंतर तृणमूल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Journalist Sagarika Ghose TMC Rajya Sabha
Journalist Sagarika Ghose TMC Rajya Sabha
Journalist Sagarika Ghose TMC Rajya Sabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements