Video : How Israeli forces rescued hostages from Hamas captivity in Rafah
Israeli strikes on Rafah
Israel-Hamas War राफा : इस्राईलच्या सैनिकांनी राफा शहरात अत्यंत नाट्यपूर्ण कारवाई करत हमासच्या ताब्यातील 2 ओलिसांची सुटका केली. ही कारवाई करताना इस्राईलने केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यात किमान 67 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले (Israeli strikes on Rafah). हमासच्या ताब्यात जवळपास शंभर ओलिस असून त्यांची सुटका करण्याच्या इस्राईलच्या प्रयत्नांना छोटे यश आले आहे. मात्र, यामुळे शांतता कराराचा मार्ग आणखीनच खडतर झाला आहे.
इस्राईलने आज इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या राफा या शहरातील एका भागावर छापा टाकला. या शहरात जमिनीवरील कारवाई करण्याचे सूतोवाच इस्राईलने काही दिवसांपूर्वीच दिले होते. दक्षिण गाझामध्येच दाट लोकवस्तीत हमासचे दहशतवादी लपून बसले असून त्यांनी विविध ठिकाणी ओलिसांना लपवून ठेवले असल्याचा इस्राईलचा अंदाज आहे.
“The hostages are in our hands, safe and sound”
🔴WATCH the moment hostages Fernando Simon Marman and Luis Har were rescued during the operation in Rafah yesterday: pic.twitter.com/1OXsHf9F9W
— Israel Defense Forces (@IDF) February 12, 2024
राफा शहरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही ओलिसांना ठेवले असल्याची माहिती इस्राईलला मिळाली होती. या इमारतीच्या चहूबाजूला आणि शेजारील इमारतींवरही हमासचे दहशतवादी तैनात होते. गुप्तपणे गेलेल्या इस्राईलच्या सैनिकांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीची सुरक्षा भेदत आत प्रवेश केला आणि ओलिसांची सुटका केली. सैनिक इमारतीत घुसताच अनेक दहशतवाद्यांनी एकाच वेळी गोळीबार सुरू केला.
मात्र, सैनिकांनी ओलिसांभोवती संरक्षक कडे तयार करत प्रतिहल्ला केला. त्याचवेळी लढाऊ विमानांनीही परिसरात हल्ले करत जमिनीवरील सैनिकांना संरक्षण दिले. सुटका केलेल्या दोन ओलिसांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. तर, इस्राईलच्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 67 जणांचा मृत्यू झाला आहे.
युद्धाला चार महिने उलटून गेल्यानंतरही हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यात यश न आल्याने इस्राईल सरकारवरील जनतेचा दबाव वाढला आहे. त्यातच, गाझा पट्टीतील 80 टक्के जनता दक्षिण गाझामध्येच एकवटली असल्याने येथे मोठी कारवाई न करण्याबाबतही त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. दुसरीकडे, शांतता करारासाठी प्रयत्न सुरू असतानाच आजची कारवाई झाली असल्याने या करारासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिका, इजिप्तसारख्या मध्यस्थ देशांची अडचण झाली आहे.
Israeli strikes on Rafah
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements