विमान हवेत असतानाच त्याचा दरवाजा उघडल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. पण विमान हवेत असताना त्याचा दरवाजा चक्क निखळून खाली पडल्याची बातमी ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसला असेल. हो ही दुर्घटना खरी असून अमेरिकेतील नायगारा येथे हा प्रकार घडला आहे. (Plane door falls off mid-air as it approaches to land at Niagara International Airport)
Niagara Frontier Transportation ऑथरिटीनं सांगितलं, चिकतोवागा (Cheektowaga) विमानतळावरुन बफेलो आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केलेल्या एका छोट्या आणि नॉन कमर्शिअल विमानाबाबत ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याचं Buffalo Niagara International Airport वर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. संध्याकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच त्याचा मागचा दरवाजा उघडला आणि तो खाली कोसळळा.
विमानानं उड्डाण केलं त्यावेळी त्यात दोन प्रवाशी आणि एक पायलट होते. स्टिगलमिअर पार्कवरुन विमान जात असताना त्याचा दरवाजा निखळून खाली कोसळला अशी माहिती पायलटनं दिली आहे. या दुर्घटनेनंतर कोणतीही जीवितहानी तसेच वस्तूचं किंवा संपत्तीचं नुकसान झालेलं नाही. ही घटनेवेळी पायलटनं एअर ट्राफिक कन्ट्रोलरशी संपर्क देखील साधला. याचं ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आलं असून “आम्हाला इमर्जन्सी असून आम्ही पुन्हा मागे परतत आहोत” असं या संदेशात म्हटलं आहे. या इमर्जन्सीबद्दल सांगताना एक जण या ऑडिओमध्ये असं बोलताना ऐकायला मिळतंय की, आम्ही आमचा मागचा दरवाजा गमावला आहे.
दरम्यान, Buffalo suburb of Cheektowaga Police विमानाचा हा निखळलेला दरवाजाचा शोध घेत आहेत. पण तो अद्याप मिळू शकलेला नाही. तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांना देखील सांगण्यात आलं आहे की, जर विमानाचा दरवाजा कुणाला आढळून आला तर त्याची तातडीनं पोलिसांना खबर देण्यात यावी.
Plane door falls off mid-air Niagara
Plane door falls off mid-air Niagara
Plane door falls off mid-air Niagara
Plane door falls off mid-air Niagara
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements