मग ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहाच
Video Viral : रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवासी स्थानकावरील वडापाव, कटलेट, भेळसह इतर अनेक खाद्यपदार्थ आवडीने खातात. मात्र, या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कारण रेल्वेस्थानकावरील फूड स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ ठेवले जात असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच काही फूड स्टॉल्सवर उंदीर, झुरळांचा वावरही अनेकदा दिसून आलाय. त्यातच पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील इटारसी जंक्शन रेल्वेस्थानकावरील एका स्टॉलवरच्या खाद्यपदार्थांवर उंदरांचा मु्क्त वावर असल्याचे दिसून आले आहे.
स्टॉलवरील खाद्यपदार्थ, तसेच जमिनीवर ठेवलेल्या कंटेनरमधील प्लेट्सवर उंदीर फिरताना दिसत होते. या किसळवाण्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हीही रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉलवरील पदार्थ खाताना 100 वेळा विचार कराल.
रेल्वे प्रवाशांसाठी प्रत्येक रेल्वेस्थानकावर आयआरसीटीसी फूड स्टॉल चालवले जातात. मात्र, व्हिडीओतील या फूड स्टॉलवरील खाद्यपदार्थांवर उंदरांचा अक्षरश: सुळसुळाट पाहायला मिळतोय. या किळसवाण्या प्रकारानंतर अनेक युजर्स रेल्वेस्थानकावरील फूड स्टॉलच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.
Rats on IRCTC food Inspection Duty 🤢
The Reason why i avoid eating food from Railway Station Vendors!!
📍Itarsi Junction, Madhya Pradesh @IRCTCofficial @AshwiniVaishnaw @RailMinIndia #IndianRailways pic.twitter.com/8y2eXbb9td
— Saurabh • A Railfan 🇮🇳 (@trainwalebhaiya) January 6, 2024
दरम्यान, ‘ट्रेनवाले भैया’ या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून रेल्वेस्थानकावरील किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओतील रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि तेथील स्वच्छता पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
युजरने व्हिडीओ रेल्वे अधिकाऱ्यांना केला टॅग
दरम्यान, एक्स युजरने रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मिश्कील टिपण्णी करीत हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला; ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “आयआरसीटीसी फूड इन्स्पेक्शन करण्यासाठी ड्युटीवर आहेत उंदीर.” या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रेल्वे फूड स्टॉलवर किंवा आजूबाजूला कोणीही नसताना उंदीर कशा प्रकारे तिथले खाद्यपदार्थ आणि वस्तूंवर आरामात वावरत आहेत. जमिनीवर ठेवलेल्या प्लेट कंटेनरपासून ते स्टॉलवरील पदार्थांच्या प्लेटपर्यंत सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट दिसत होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे खाद्यपदार्थ असेच उघड्यावर ठेवून तेथील कर्मचारी कुठे गायब होते.
या किळसवाण्या प्रकारावर रेल्वे सेवा हॅण्डलवरून उत्तर देण्यात आले आहे. या घटनेची चौकशी केली जात आहे आणि पश्चिम-मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाकडून आवश्यक कारवाई केली जाईल. या नोटवर या विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी नमूद केले की, त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements