आयकर विभागाची हनुमानजींना नोटीस, साडेतीन कोटी कर भरण्यासाठी…
अखेर साडेतीन कोटींच्या कराची मागणी सोडली
देशात अंमलबाजावणी संचालनालय (ईडी), आयकर विभाग (आयटी) आणि सीबीआयची चर्चा सुरुच आहे. तपास संस्थांचा गैरवापर केंद्र सरकार करत असल्याचा आरोप विरोधक करत आहे. परंतु आयकर विभागाचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आयकर विभागाने हनुमान मंदिराला कर भरण्याची नोटीस दिली आहे. मध्य प्रदेशच्या इंदोर शहरातील ही बातमी आहे. हनुमानाच्या मंदिराने आयकर विभागाविरोधातला दावा जिंकला आहे. नोटबंदी काळात या मंदिरात साडेतीन कोटी रुपये दान जमले होते. या रकमेवर आयकर विभागाने कर मागितला होता. ती मागणी अखेर आयकर विभागाने मागे घेतली आहे (Indore’s Ranjeet Hanuman Temple Wins Landmark Income Tax Case)
नोटबंदी जाहीर होताच मंदिर प्रशासनाने मंदिराच्या दानपेट्या उघडल्या होत्या. यामध्ये त्यांना साडेतीन कोटी रुपये मिळाले होते. ते त्यांनी बँकेत जमा केले होते. एकदम एवढी रक्कम आल्याने आयकर विभागाच्या रडारवर ती आली होती. यामुळे आयकर विभागाने मंदिर प्रशासनाला नोटीस पाठविली होती. याविरोधात मंदिर प्रशासनाने टॅक्स कमिशनरांकडे अपिल दाखल केले होते (Indore : ₹ 3.50 Cr I-T Demand Raised On Ranjeet Hanuman Temple Quashed)
श्री रणजीत हनुमान मंदिराचे हे प्रकरण आहे. चार वर्षे यावर सुनावणी सुरु होती. ही रक्कम कुठून आली असा सवाल नोटीसमध्ये विचारण्यात आला होता. मंदिर प्रशासनाने भक्तांनी दान केली होती, असे उत्तर दिले. यावर आता आयकर विभागाने नमते घेतले आहे. मंदिराची नोंदणी नाहीय. तसेच ही चॅरिटेबल ट्रस्टही नाहीय. तसेच आयकर विभागाच्या नियमांतही रजिस्टर नाहीय. यामुळे साडेतीन कोटींवरील डिमांड रद्द करण्यात आली आहे. यामध्ये पेनल्टी आणि व्याजही वेगळे मागण्यात आले होते.
या युक्तीवादात केंद्र सरकारच्या एका नोटिफिकेशनचा दाखल देण्यात आला. त्यानुसार इंदूरमध्ये अनेक मंदिर, मठ, गुरुद्वारांची नोंदणी झाली नाही. परंतु ते आयकर सुटसाठी पात्र आहेत. तसेच मंदिराची रक्कम सरकारची आहे. हा युक्तीवाद मान्य करत आयकर विभागाचा दावा फेटाळण्यात आला.
Indore Ranjeet Hanuman Temple Income Tax Case
Indore Ranjeet Hanuman Temple Income Tax Case
Indore Ranjeet Hanuman Temple Income Tax Case
Indore Ranjeet Hanuman Temple Income Tax Case
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements