IndiGo plane misses taxiway after landing at Delhi airport
पंजाबच्या अमृतसरहून आलेले इंडिगोचे विमान आज सकाळी दिल्ली (Delhi Airport – A320 aircraft) विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीवे चुकले (Indigo flight missed taxiway) होते. विमान टॅक्सीवे चुकल्याने अनेक उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे. यानंतर धावपट्टीवर एकच गोंधळ उडाला होता (Indira Gandhi International Airport (IGIA)).
अमृतसरहून आलेले इंडिगोचे विमान आज सकाळी दिल्ली (Delhi) विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीवे चुकले. त्यामुळे एक धावपट्टी सुमारे 15 मिनिटे ठप्प झाली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) नियोजित टॅक्सीवे चुकल्याने विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकावर गेल्याची घटना घडली आहे (IndiGo incoming flight misses exitway on landing at IGIA).
देशातील सर्वात मोठं विमानतळ : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Delhi Indira Gandhi International Airport) हे देशातील सर्वात मोठे विमानतळ आहे. तिथे दररोज 1400 हून अधिक उड्डाणे होतात. या विमानतळावर 4 धावपट्टी कार्यरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या विमानतळावरून अशा घटना समोर येत आहेत. 31 जानेवारी रोजी इंडिगोने देवघर, झारखंडला जाणारे फ्लाइट रद्द केल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या विरोधामुळे दिल्ली विमानतळावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला होता. त्यांनी ‘इंडिगो चोर है’च्या घोषणाही दिल्या होत्या. याशिवाय गेल्या महिन्यात क्रिकेटर मयंक अग्रवालने दिल्लीहून जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये (Idigo Airline Flight) विषारी पेय प्यायल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
यापूर्वी समोर आलेली प्रकरणं : जानेवारीतच दुसऱ्या एका घटनेत दिल्लीहून बाकूला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo Flight) विमानाच्या वैमानिकांना ड्युटीवरून काढून टाकण्यात आलं होतं. कारण या वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून मंजुरी न घेता उड्डाण केलं होतं. यासोबतच विमानाच्या धावपट्टीवर जेवण करताना प्रवाशांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरी उड्डयन सुरक्षा मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
IndiGo plane misses taxiway at Delhi airport
IndiGo plane misses taxiway
IndiGo plane misses taxiway
IndiGo plane misses taxiway
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements