महत्त्वाच्या अटी अन् अर्ज कसा भरायाचा जाणून घ्या…
Indian Army Agniveer Recruitment 2024
भारतीय सैन्यात काम करून देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया 8 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
शेवटची तारीख कधी आहे : कृपया लक्षात घ्या की भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावा.
वय श्रेणी : या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 17 ते 21 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज फी : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 550 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे जे ऑनलाइन माध्यमातून जमा केले जाऊ शकते.
भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणीत बसतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा मेडिकल होईल. या सर्व टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्ज कसा करायचा Indian Army Agniveer Recruitment 2024 :
सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्याच्या होम पेजवर, JCO/OR/Agniveer Apply च्या लिंकवर क्लिक करा किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करा.
त्यानंतर अग्निवीर लॉगिन पेज उघडेल.
यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
आता फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू करा.
शेवटी, फी ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या.
Indian Army Agniveer Recruitment 2024
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements