IND vs AFG मॅचमध्ये ड्रामा, सस्पेन्स, थ्रिल, पैसा वसूल
भारत आणि अफगाणिस्तान तिसरा टी20 सामना रोमांचक
India vs Afghanistan, 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना रोमांचक झाला (India vs Afghanistan 3rd T20 second Super Over). पहिली सुपरओव्हरही टाय झाली. सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला. रवि बिश्नोई याने 3 चेंडूमध्ये दोन फलंदाजांना तंबूत धाडलं.
रवी बिष्णोईने दोनवेळा टाय झालेली मॅच 3 बॉलमध्ये संपवली
बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेला तिसरा टी 20 सामना टाय झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागेल असे वाटत असतानाचं सुपरओव्हरही टाय झाली. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर झाली.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये काय झालं?
अफगानिस्तानकडून गुरबाज आणि नायब गुलबदीन सलामीला आले होते. भारताकडून मुकेश कुमार यानं षटक टाकलं. अफगाणिस्तान संघाने सुपरओव्हरमध्ये एक विकेटच्या मोबदल्यात 16 धावा काढल्या (India vs Afghanistan 3rd T20 second Super Over).
0.1 – मुकेश कुमारच्या चेंडूवर गुलबदीन याने लाँग ऑनला फटका मारला. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात गुलबदीन बाद झाला. विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे पहिल्याच चेंडूवर गुलबदीन याने विकेट फेकली.
0.2- मोहम्मद नबी याने मुकेश कुमारच्या दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली.
0.3 – गुरबाज याने मुकेश कुमारचा चेंडूवर चौकार लगावला.
0.4. गुरबाज याने मुकेश कुमारच्या चेंडूवर 1 धाव घेतली.
0.5 – मोहम्मद नबी याने मुकेश कुमारचा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवत 6 धावा वसूल केल्या.
0.6. मुकेश कुमार याने नबीला अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. संजू सॅमसन याने टाकलेला थ्रो मुकेश कुमार याला अडवता आला नाही. नबी आणि गुरबाज यांनी 3 धावा काढल्या. अफगाणिस्तान संघाने बायच्या रुपात 3 धावा काढल्या.
भारताला विजयासाठी अफगाणिस्तानकडून 17 धावांचे आव्हान मिळाले. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा सलामीला आले होते. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजई याने गोलंदाजी केली.
0.1 – अजमतुल्लाह उमरजई याने रोहित शर्माला चेंडू फेकला. या चेंडूवर रोहित शर्मा याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण फसला तरी रोहित आणि यशस्वी जायस्वाल यांनी 1 चोरटी धाव घेतली.
0.2 – अजमतुल्लाह उमरजई याने अतिशय चुताराईने गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला फक्त 1 धाव घेता आली.
0.3 – रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार मारला. भारताची धावसंख्या 3 चेंडू 8 धावा. भारताला विजयासाठी 3 चेंडूत 9 धावांची गरज
0.4 – रोहित शर्माने चौथ्या चेंडूवरही ऑफसाईडला कव्हरवरुन जबरदस्त षटकार मारला. भारताने 4 चेंडूत 14 धावा केल्या. भारताला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज
0.5 – अजमतुल्लाह उमरजई याच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने एक धाव काढली. आता भारताला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची गरज (रोहित शर्मा रिटायरहर्ट होऊन तंबूत परतला)
0.6 – अखेरच्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला 1 धाव काढता आली. पहिली सुपर ओव्हरही टाय झाली (India vs Afghanistan 3rd T20 second Super Over).
सुपरओव्हरही टाय झाल्यामुळे आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारताकडून रोहित शर्मा आणि रिंकू सिंह मैदानात उतरले होते. तर अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने गोलंदाजाची जबाबदारी घेतली होती.
0.1 – रोहित शर्माने फरीद अहमद याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला.
0.2 – रोहित शर्माने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत इरादे स्पष्ट केले.
0.3. – रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताने 3 चेंडूमध्ये 11 धावा वसूल केल्या.
0.4 – मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंह विकेटकिपरकडे झेलबाद झाला. भारताला 11 धावांवर पहिला धक्का बसला.
0.5 – संजू सॅमसन याला मोठा फटका मारता आला नाही, विकेटकिपरकडे चेंडू गेल्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा धावबाद झाला. त्यामुळे अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 12 धावांचे आव्हान मिळाले (India vs Afghanistan 3rd T20 second Super Over).
दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 12 धावांचे आव्हान दिले. भारताकडून रवि बिश्नोई याने गोलंदाजी केली. तर अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि मोहम्मद नबी फलंदाजीसाठी उतरले.
0.1 – रवि बिश्नोईच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबी याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू रिंकू सिंह याच्या हातात विसावला. अफगाणिस्तानला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. अफगाणिस्तानला विजयासाठी 5 चेंडूत 12 धावांची गरज.. फलंदाजीसाठी जनत मैदानावर आला.
0.2- रवि बिश्नोईच्या दुसऱ्या चेंडूवर जनत याने एक धाव घेतली. अफगाणिस्तानला विजयासाठी 4 चेंडूत 11 धावांची गरज
03. – गुरबाज याला बाद करत रवि बिश्नोईने भारताला विजय मिळवून दिला. रिंकू सिंहने झेल पकडला.
India vs Afghanistan 3rd T20 second Super Over
India vs Afghanistan 3rd T20 second Super Over
India vs Afghanistan 3rd T20 second Super Over
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements