प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित
Former Pakistan PM Imran Khan
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे (Pakistan Tehreek-e-Insaf party). गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे (Imran Khan handed 10 years in prison for leaking state secrets).
पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने आज या संदर्भातील निर्णय दिला. 23 ऑक्टोबर 2023 रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने आज या संदर्भातील निर्णय दिला. 23 ऑक्टोबर 2023 रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते (The so-called cipher case revolves around the alleged leaking of secret diplomatic correspondence sent by Pakistan’s ambassador in Washington to Islamabad when Mr Khan was prime minister).
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) आरोप केला आहे की, दस्तऐवजात अमेरिकेने इम्रान खान यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती. इम्रान खान यांना 5 ऑगस्टला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 29 ऑगस्टला त्यांची शिक्षा स्थगित केली होती, परंतु Cipher प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यामुळे ते तुरुंगातच होते. यादरम्यान, 30 सप्टेंबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये कुरेशी यांचे सायफर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.
Cipher केस म्हणजे काय? : इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा सायफरचा खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका हात असल्याचा आरोप केला होता. यासाठी वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने त्यांना एक केबल (टेप किंवा गुप्त माहिती) पाठवल्याचे इम्रानने सांगितले. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त मुत्सद्दी संभाषण सार्वजनिक केले होते. त्याला ‘Cipher’ असे म्हणतात.
इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
Imran Khan handed 10 years in prison
Imran Khan handed 10 years in prison
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements