एचएसआरपीचे स्टिकर मिळणार; अतिसुरक्षित नंबर प्लेट
High Security Registration Plates (HSRP)
बेळगाव : चारचाकी आणि दुचाकीधारकांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे. आतापर्यंत ज्यांनी हाय सिक्युरीटी नंबर प्लेट लावलेली नाही त्यांना अडचणी येऊ शकतात. एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या प्रत्येक वाहनाला ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आली आहे. या विशिष्ट नंबर प्लेटमुळे (High Security Registration Plates (HSRP)) बनावट प्लेटद्वारे पोलिस व अन्य सरकारी विभागांची दिशाभूल करणे अशक्य ठरेल. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, मल्टिअँक्सेल अशा सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटना हा नियम लागू होणार आहे. यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना यापुढे एचएसआरपी नंबर प्लेट लावून घेणे बंधनकारक केले आहे. वाहनांची सुरक्षितता आणि गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी तसेच वाहनसंबंधित अपराध रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नंबर प्लेट लावून घेण्यासाठी 17 फेब्रुवारी 2024 अखेरची मुदत आहे. बनावट नंबर प्लेट लावून अनेक वाहनांतून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशात एकरूप नोंदणी संख्या असणाऱ्या नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व जुन्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलून घ्याव्या लागणार आहेत. अतिसुरक्षित नोंदणी फलक (एचएसआरपी) लावून घ्यावेत, असे आवाहन कर्नाटक परिवहन विभागाने केले आहे. नंबर प्लेट लावून घेण्यासाठी 17 फेब्रुवारी 2024 अखेरची मुदत आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंडाची आकारणी करण्यात येणार आहे (HSRP number plates before Feb 17).
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील वाहनांवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. तथापि, कर्नाटक परिवहन विभागाने 18 ऑगस्ट 2023 रोजी हा आदेश दिला आहे. वाहनाची नोंदणी 1 एप्रिल 2019 पूर्वी केलेल्या प्रत्येक वाहनधारकाला यापुढे अतिसुरक्षित नंबरप्लेटची नोंदणी करुन घ्यावी लागणार आहे. ‘एचएसआरपी’ एक होलोग्राम स्टिकर असून त्यावर ठराविक अंकी क्रमांक आहे. त्यात वाहनाचा इंजिन क्रमांक तसेच चेस्सी क्रमांकही असेल. वाहनाची सुरक्षितता व तपशील सहजरित्या समजावा, यासाठी ही योजना आहे. राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे, संबंधितांनी मुदतीत एचएसआरपी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन बेळगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडास यांनी केले आहे. सध्या ही सेवा दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश कर्नाटकसह 12 राज्यांमध्ये ही सेवा सुरु आहे. प्रत्येकाने नोंदणी करुन घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कुणी नोंदणीविना रस्त्यावर वाहन फिरवत असेल तर त्यांना 500 ते 1000 रुपये दंड केला जाणार आहे (HSRP number plates before Feb 17).
नोंदणी नसेल तर जितक्या वेळा वाहन पकडले जाईल, तितक्या वेळा अशी कारवाई करण्याचा विचार देखील परिवहन खाते करत आहे. ‘एचएसआरपी’ नोंदणी वाहन विक्रीच्या कार्यालयातूनही करता येते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन नोंदणी करताना वाहनाचा तपशील द्यावा लागणार आहे. वाहन क्रमांक असलेली नियमित नंबरप्लेट राहणार आहेच. परंतु, यावर चिकटवण्यासाठी एचएसआरपीचे स्टिकर मिळणार आहे. दुचाकी वाहनांसाठी 250 ते 300 रुपये तर चारचाकी वाहनांसाठी 400 ते 500 रुपये खर्च होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने नेमून दिलेल्या वाहन कंपन्यांच्या डिलर्सलाच नंबरप्लेट बसविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपली फसवणूक होऊ न देता www.siam.in किंवा transport.karnataka.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नावनोंदणी करावयाची आहे. अनेक ठिकाणी एचएसआरपीच्या नावाखाली भलत्याच नंबरप्लेट करून दिल्या जात असल्याने वाहनचालकांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत
1 एप्रिल 2019 नंतर वाहन घेतलेल्या वाहनांची एचएसआरपी नोंदणी आहे. परंतु, त्यापूर्वीच्या वाहनांवरही एचएसआरपी नोंदणीचा आदेश आला आहे. ही वेगळी नोंदणी आहे म्हणून वाहनधारकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोणत्याही वाहन विक्रेत्याकडे जाऊन याची ऑनलाईन नोंदणी करुन घेता येते.
-नागेश मुंडास, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेळगाव
belgaum ALL vehicles in Karnataka must get HSRP number plates before Feb 17 belgavkar बेळगाव belgaum hsrp number
belgaum Karnataka makes new number plates mandatory for all vehicles, to start issuing challan from this date belgaum
HSRP number plates before Feb 17
HSRP number plates before Feb 17
HSRP number plates before Feb 17
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements