Ram Mandir Ayodhya
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मिळूनही काँग्रेसने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून गुजरातमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता पक्षाच्या या भूमिकेमुळे एका ज्येष्ठ नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचाही राजीनामा दिला आहे (Gujarat Congress MLA resigns, was ‘upset’ over party stance on Ram Mandir event).
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आमदार सी. जे. छावडा (MLA CJ Chavda) यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सोपवला. विजापूर विधानसभा (Assembly) मतदारसंघातून ते तीनवेळा आमदार झाले आहेत. राम मंदिराबाबत (Ram Mandir) पक्षाच्या भूमिकेमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
छावडा म्हणाले, मी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मागील 25 वर्षे काँग्रेससाठी काम केले. अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे देशातील लोक आनंदित आहेत. या आनंदात सहभागी होण्याऐवजी पक्षाने वेगळीच भूमिका घेतली. त्यामुळे मी नाराज आहे. गुजरातचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या कामाला, धोरणांना आम्ही मदत करायला हवी. पण काँग्रेसमध्ये असल्याने मला ते शक्य होत नाही. त्यामुळे राजीनामा दिल्याचेही छावडा यांनी स्पष्ट केले. छावडा यांच्याप्रमाणे पक्षातील इतर काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, छावडा यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ 15 पर्यंत खाली आले आहे. छावडा हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याआधी चिराग पटेल यांनीही काही दिवसांपुर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठे धक्के बसू लागले आहेत.
Gujarat Congress MLA Resign Ram Mandir event
Gujarat Congress MLA Resign Ram Mandir event
Gujarat Congress MLA Resign Ram Mandir event
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310