तुमच्या ट्रिपविषयी माहिती मिळेल आणि ते तुमच्या घरी दरोडा घालण्याचा प्रयत्न करतील
फिरण्यासाठी हॉटेल किंवा फ्लाइट बुकिंग करताना अनेकजण ट्रॅव्हल पोर्टलची मदत घेतात. मात्र हेच पोर्टल अनेकदा लोकांना त्यांचा डेटा शेअर करण्यासाठी ‘संमती’ देण्यासाठी फसवतात. एखाद्या ट्रॅव्हल पोर्टलवरून बुकिंग करताना अनेकदा ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’मधील डेटा मिळवण्यासाठी आधी ‘संमती’ विचारली जाते. हीच कॉन्टॅक्ट लिस्ट नंतर ते जाहिराती आणि त्यांचे ऑफर्स विकण्यासाठी वापरतात. एका व्यक्तीला नुकताच असाच एक अनुभव आला. त्याने ‘गोआयबिबो’ (Goibibo) या प्रसिद्ध बुकिंग पोर्टलला टॅग करत सुनावलं आहे. या पोर्टलने संबंधित व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांनाच त्याच्या ट्रिपबद्दलची माहिती पुरवली आहे. आकाश असं या तक्रारकर्त्याचं नाव आहे. आकाशने एक्सवर (ट्विटर) Goibibo च्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ही तक्रार केली आहे.
कंपनीला टॅग करत त्याने लिहिलं, ‘तुम्ही माझ्या फोनमधील कॉन्टॅक्सना माझ्या ट्रीपबद्दलची माहिती देणारा एसएमएस कसा पाठवू शकता? तुम्ही वेडे झालात का? मी तुम्हाला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टबद्दलची कोणतीच परवानगी दिली नव्हती आणि कधी देणारही नाही. हे स्पॅमिंग आणि गोपनीयतेचं उल्लंघन आहे.’ आकाशच्या या पोस्ट असंख्य नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली (‘This is scary’: Travel app sends flyer’s trip notification to his entire contact list in shocking incident).
आणखी एका पोस्टमध्ये आकाशने Goibibo च्या कस्टमर केअर स्टाफसोबत झालेल्या संवादाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. Goibibo च्या टीम मेंबरने त्याला सांगितलं की ‘ॲप इन्स्टॉल करून सिंकचं फिचर बंद करा. जेणेकरून कंपनीला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टची संमती मिळणार नाही.’ मात्र आकाशने जेव्हा तसं करून पाहिलं तेव्हा त्याला समजलं की त्याने अशी कोणती परवानगी कंपनीला किंवा ॲपला आधी दिलीच नव्हती.
‘दुसऱ्या फॉलो-अप कॉलमध्ये जेव्हा मी कस्टमर केअर मेंबरला याविषयी सांगितलं, तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं की त्यांच्या बॅकएंड टीमने काल तुमच्यासाठी ते फिचर डिसेबल म्हणजेच बंद केलं होतं. कंपनीने मला असंही आश्वासन दिलं आहे की ते फिचर पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करतील किंवा युजरच्या गोपनीयतेला बाधा आणणार नाही अशा प्रकारे ते सुधारण्याचा प्रयत्न करतील. विशेष म्हणजे मी त्यांचं ॲप सहा महिन्यांपूर्वीच अनइन्स्टॉल केलं होतं आणि माझ्या मते त्यांनी हे फिचर त्यानंतर आणलं होतं. त्यामुळे माझ्याकडून संबंधित फिचरसाठी कोणतीच परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांनी ते फिचर पूर्णपणे काढून टाकावं’, अशी मागणी आकाशने केली आहे. आकाशच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.
Man claims Goibibo shared his trip notification with his contact list
Travel app sends flyer’s trip notification to his entire contact list
Goibibo shared trip notification with contact list
Goibibo shared trip notification with contact list. Goibibo shared trip notification with contact list
Goibibo shared trip notification with contact list
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements