मिरज (सांगली) : पतीसोबत भांडणानंतर सासर सोडून मिरजेत आलेल्या 23 वर्षीय महिलेवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला लग्नासाठी निर्दयीपणे तिला कर्नाटकात नेऊन 4 लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित खरेदीदार महिलेने तिचा व्यवहार करून परस्पर लग्न लावून दिले. याप्रकरणी 11 जणांविरोधात येथील महात्मा गांधी पोलिस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेसह आत्तापर्यंत 7 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी महम्मदहुसेन महम्मदगौस शेख (वय 31), अबुजर फारुख जमादार (वय 18), महंम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला (वय 20), खालीद मुबारक कोरबू (वय 20), जुबेर ऊर्फ कपाला शब्बीर शेख (वय 24), महम्मदगौस ऊर्फ सरफू शेरखान फकीर (वय 22), संतोषी बाबू नाशिककर (लग्नानंतरचे नाव इरम महम्मदगौस फकीर, वय 26) (सर्व रा. ख्वॉजा वस्ती, मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह गंगा आणि मुक्ता नामक दोन महिला, अण्णा नामक एक व्यक्ती आणि कर्नाटकात लग्न लावून दिलेला ब्रातेश (रा. जमखंडी) अशा 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नराधमांपैकी मिरजेतील ख्वॉजा वस्तीतील एकाचे नेमके नाव पीडितेला ज्ञात होते. मिरजेतील तपासाधिकारी निरीक्षक सुधीर भालेराव त्या नावावरून सर्व आरोपींपर्यंत पोहचले. पोलिस तपासात सर्व सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल लोकेशन जुळत असल्याने पीडितेच्या बोलण्यात तथ्य असल्याचे स्पष्ट होताच गतीने कर्नाटकपर्यंत पोलिसांनी माग काढत सर्व सूत्रे जुळवली. लवकरच उर्वरित आरोपींनाही गजाआड केले जाईल, असे श्री. भालेराव यांनी सांगितले.
Gang Rape Case Miraj Sale in Karnataka
Gang Rape Case Miraj Sale in Karnataka
Gang Rape Case Miraj Sale in Karnataka
Gang Rape Case Miraj Sale in Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements