महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (3 फेब्रुवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात अजितदादा हे शरद पवार गटाबरोबरच महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मूळचे सोलापूरचे पण कर्नाटकातील इंडीचे (विजापूर) माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह सोलापूरमधील काही माजी नगरसेवकही उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे (Former MLA Ravikant Patil will join NCP).
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष बांधणीच्या कार्यक्रमासाठी प्रथमच सोलापुरात येत आहेत. आपल्या पहिल्याच दौऱ्यात पवार यांनी मोठे मासे गळाले लावले आहेत. त्यात सोलापूरचे मात्र कर्नाटकातील इंडी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार रविकांत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
रविकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते सुधीर खरटमल यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली हेाती. त्याचवेळी पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आपण सोलापूरच्या विकास कामांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यावेळी या दोघांनी सांगितले होते. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले पण सध्या शरद पवार गटात असलेले माजी नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी तर आपण अजितदादांसोबत जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तीच भूमिका माजी नगरसेवक सुभाष डांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली आहे. यासोबतच एमआयएमचे काही माजी नगरसेवकही उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शरद पवार गटातील आणखी कोणते नेते दादांच्या गळाला लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, सोलापूर दौऱ्यात अजित पवार हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनाही भेटणार आहेत. माने हे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर गेले होते. मात्र, त्याच मानेंना राखीव वेळ देत अजितदादांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. कारण माने हे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागात बळकट असलेल्या पक्षाला शहरातही बळकट करण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत भेटणारे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनाही अजितदादांनी राखीव वेळ दिला आहे. त्यामुळे चंदनशिवेंसारख्या जनतेतील नेत्याला आपल्या गोटात ओढून पवार यांनी विधानसभेचीही तयारी चालवल्याचे मानले जात आहे. आनंद चंदनशिवे हे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महत्वाचे नेते आहेत.
Former MLA Ravikant Patil will join NCP
Former MLA Ravikant Patil will join NCP
Former MLA Ravikant Patil will join NCP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements