- Lok Sabha Exit Polls 2024
- एक्झिट पोल करताना खोलात जात नाहीत. वरवरचे हे सर्वेक्षण
- Lok Sabha Elections 2024 | Exit polls favour BJP in Karnataka, daunt Congress with single digit
Exit Polls 2024 : लोकसभा निवडणुकी आधीच एक्झिट पोलने निकाल जाहीर झाल्याचे चित्र आहे. भाजप एकतर्फी विजय मिळवत एनडीएच्या साथीने 350 पार करत असल्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात राज्यात देखील काँग्रेसला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी आपला एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. ‘मला फोन आले की काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये एक किंवा दोन जागा मिळतील. पण मी स्पष्ट सांगतो की काँग्रेसला दुहेरी अंकात जागा कर्नाटकमध्ये मिळणार आहे’, असे डी के शिवकुमार यांनी ठणकावून सांगितले. एक्झिट पोल करताना खोलात जात नाहीत. वरवरचे हे सर्वेक्षण केले जाते. माझ्यावर विश्वास ठेवा इंडिया आघाडी सत्ता मिळवणार आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा चांगले यश काँग्रेसला मिळणार आहे, असा डी के शिवकुमार म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसला दोन किंवा तीन जागा मिळण्याच्या दाव्याची काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, मी कर्नाटकमधूनच राज्यसभेचे उमेदवार आहे. त्यामुळे तेथे काय सुरू आहे… हे मी चांगले सांगू शकतो. 4 जून नंतर एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठं अंतर असेल
…295 जागा मिळणार : इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. राहुल गांधी यांनी देखील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की एक्झिट पोल हे मोदीच्या दबावाखील खोटे आकडे दाखवत आहे. इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार.
Exit polls favour BJP in Karnataka
Exit polls favour BJP in Karnataka
Exit polls favour BJP in Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements