EPFO hikes interest rate on Provident Fund
EPFO Fixes Interest Rate : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employees’ Provident Fund Organisation (EPFO)) 6 कोटींहून अधिक PF खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी झालेल्या CBT बैठकीत पीएफमध्ये 0.10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. EPFO ने 2023-24 साठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF चा व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे (EPFO hikes interest rate on provident fund to 8.25% from 8.15%).
यापूर्वी सरकारने 2022-23 मध्ये पीएफ खातेधारकांच्या ठेवींवरील व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के केला होता. (@) कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (Central Board of Trustees (CBT)) शनिवारी EPFO च्या 235 व्या बोर्ड बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली.
EPFO ची संस्था, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ने शनिवारी झालेल्या बैठकीत 2023-24 साठी EPF वर 8.25 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. CBT च्या निर्णयानंतर, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. यावर सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर, 2023-24 साठी EPF वरील व्याजदर EPFO च्या 6 कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्याजदराची अंमलबजावणी होते. यापूर्वी मार्च 2020 मध्ये, EPFO ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2018-19 साठी 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणले होते.
पीएफचे फायदे काय आहेत? : पीएफ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते. पीएफमध्ये जमा केलेल्या पैशावर व्याज मिळते आणि निवृत्तीनंतर, कर्मचारी ते एकरकमी किंवा पेन्शन म्हणून मिळवू शकतो. पीएफमध्ये जमा केलेले पैसे तुम्ही घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकामासाठी कर्ज घेण्यासाठी वापरू शकता. याशिवाय पीएफचा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येतो. पीएफमध्ये जमा केलेले पैसे लग्नासारख्या काही विशिष्ट परिस्थितींसाठी देखील वापरले जाऊ शकतात.
After the government’s ratification, the interest rate on EPF for 2023-24 will be credited into accounts of over six crore subscribers of EPFO.
EPFO hikes interest rate on provident fund
EPFO hikes interest rate on provident fund
EPFO hikes interest rate on provident fund
EPFO hikes interest rate on provident fund
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310