Do not use children in election campaigning
निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स जारी
लोकसभा निवडणुका कधीही लागण्याची शक्यता
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने गाईडलाईनही जारी केल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचार आणि रॅलीत लहान मुले आणि अल्पवयीन मुलांचा वापर करण्यास मनाई केली आहे. लहान मुलांना निवडणूक प्रचाराची पत्रक वाटप करण्यास सांगू नका, पोस्टर चिपकवायला लावू नका आणि पक्षाचे झेंडे हातात घेऊन मुलांना घोषणा द्याययला लावू नका. नाही तर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीदच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करणं हे निवडणूक नियमांचा भंग ठरणार आहे.
निवडणुकीत निवडणूक कामात लहान मुलांचा वापर करणं खपवून घेतलं जाणार नाही, असं निवडणूक आयोगाने कठोर शब्दात स्पष्ट केलं आहे. कोणत्याही प्रकारे लहान मुलांना निवडणूक प्रचारात सामील करून घेणं, त्यांच्याकडून कविता म्हणून घेणं, गाणी म्हणून घेणं, लहान मुलांना प्रचारात घोषणा द्यायला लावणं आदी गोष्टी करून घेणं निवडणूक नियमांचं उल्लंघन ठरणार आहे. तसेच लहान मुलांना प्रचार चिन्हांचा प्रचार करून घेण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने निवडणुकीत लहान मुलांचा वापर केल्यास त्यांच्यावर बालकामगार कायद्यांसह इतर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, उमेदवाराच्या आईवडिलांसोबत त्यांचा मुलगा असेल तर हा निवडणुकीचा भंग मानलेला नाही. तसेच निवडणूक प्रचाराच्या गाईडलाईनचं उल्लंघनही मानलं जाणार नाही.
लहान मुलांचा निवडणूक प्रचारात वापर केल्याचं आढळून आल्यास राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर बाल कामगार ( निषिद्ध आणि विनियमन) द्वारे सुधारीत बाल कामगार (निषिद्ध आणि विनियमन) अधिनियमन, 1986 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. आयोगाने आपल्या गाईडलाईनमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला दिला आहे. सुधारीत अधिनियम, 2016नुसार सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर होणार नाही हे निश्चित करावं आणि राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना त्याची परवागनी देऊ नये.
Do not use children in election campaigning
Do not use children in election campaigning
Do not use children in election campaigning
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements