टी. आर. बालू हे बोलायला उभे राहिले त्यानंतर त्यांनी…
लोकसभेत केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांना डीएमके खासदार टी. आर. बालू यांना अनफिट म्हटलं. त्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला. डीएमएके खासदार टी. आर. बालू हे प्रश्न विचारायला उभे राहिले. त्यावेळी सत्ताधारी खासदारांशी त्यांचा थोडा वाद झाला. त्यानंतर ते भडकले. त्यांनी टी. आर मुरुगन यांना अनफिट म्हटलं. ज्यामुळे सत्ताधारी पक्षाचे खासदारही भडकले (DMK MP calls Union Minister unfit).
नेमकं काय घडलं? : लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. त्यावेळी डीएमकेचे खासदार टी. आर. बालू यांच्या एका शब्दाने जोरदार हंगामा झालेला पाहण्यास मिळाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले खासदार एकमेकांविरोधात आक्रमक झाले. टी. आर. बालू हे एक प्रश्न विचारायला उभे राहिले. त्यांनी केंद्रीय मंत्री मुरुगन यांना अनफिट म्हटलं आणि सगळा वाद सुरु झाला. सत्ताधारी विरोधी खासदारांचा गदारोळ सुरु झाला.
कायदा मंत्री अर्जुन मेघवाल म्हणाले, टी. आर. बालू यांचा प्रश्नच संदर्भाला धरुन नाही. त्यामुळे मंत्री मुरुगन त्यांना बसायला सांगत होते. मात्र बालू यांनी अनफिट शब्दाचा प्रयोग करायला नको होता. टी. आर. बालू यांनी एका दलित मंत्र्याचा अपमान केला आहे. एवढंच नाही तर मेघवाल म्हणाले तुम्ही जो प्रश्न विचारत आहात तो औचित्याला धरुन नाही. आमचे सहकारी मुरुगन यांचा बालू यांनी अपमान केला. बालू यांनी माफी मागावी कारण त्यांनी दलित समाजाचा अपमान केला आहे. मात्र मी माफी मागणार नाही अशी भूमिका बालू यांनी घेतली आहे.
DMK MP calls Union Minister unfit over fund disbursal
DMK MP calls Union Minister unfit over fund disbursal
DMK MP calls Union Minister unfit over fund disbursal
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310