काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार
कर्नाटक राज्यात उपमुख्यमंत्र्यांची 3 नवीन पदे निर्माण करण्यास उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कडाडून विरोध केला आहे. तसे झाल्यास आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा स्पष्ट संदेश हायकमांडला दिला आहे. मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वर, के. एन. राजण्णा, डॉ. एच. सी. महादेवप्पा, दिनेश गुंडूराव, के. एच. मुनियप्पा, एम. बी. पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी यांनी बंगळूर येथे आलेले प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. तसेच आणखी तीन उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्याची विनंती केली.
Karnataka Congress, DK Shivakumar
ही माहिती मिळताच डी. के. शिवकुमार यांनी एआयसीसीचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी फोनवर बोलून उपमुख्यमंत्री पदाच्या निर्मितीला विरोध दर्शवला. तसे झाल्यास मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून केवळ केपीसीसी अध्यक्ष म्हणून काम करू, असे सांगितल्याचे समजते. शिवकुमार यांची ही भूमिका काँग्रेस नेत्यांसाठी तापदायक ठरणार आहे. एकीकडे उपमुख्यमंत्रिपद निर्माण करण्यासाठी मंत्र्यांचा दबाव, दुसरीकडे शिवकुमार यांच्या विरोधकांनी हायकमांडला अडचणीत आणले असून काय निर्णय घ्यायचा, याबाबत काँग्रेस हायकमांड द्विधामनस्थितीत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन उपमुख्यमंत्रिपदे तयार झाल्यास ते पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे काही मंत्री हायकमांडला पटवून देत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जवळच्या वर्तुळात ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या निर्मितीसाठी दबाव आणला असून, तसे झाल्यास आपण उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ आणि पक्षाध्यक्ष म्हणूनच काम पाहू व लोकसभेत सक्रियपणे सहभागी होऊन पक्षाला विजय मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करू, असे शिवकुमार यांनी वरिष्ठांना सांगितले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले. नवीन सरकार स्थापनेदरम्यान सिद्धरामय्या यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी राजी करण्यात आले होते. त्यावेळीही शिवकुमार यांनी केवळ आपणास एकमेव उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अतिरिक्त उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केल्यास मी उपमुख्यमंत्री होणार नाही, असे बजावले होते. त्यामुळे हायकमांडने शिवकुमार यांनाच उपमुख्यमंत्री केले. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले ज्येष्ठ आमदार नाराज झाले होते, मात्र, हायकमांडच्या सूचनेनुसार मंत्रिपद स्वीकारून ते शांत राहिले.
सरकारला सहा महिने पूर्ण होताच उपमुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा लॉबिंग सुरू झाले आणि काही दिवसांपासून इच्छुक नेत्यांनी डिनर पार्टीच्या नावाखाली गुप्त बैठका घेतल्या. त्यामुळे हायकमांडच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या नवीन उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न कसा सोडवावा, असा प्रश्न हायकमांडसमोर आहे.
Internal rift in Karnataka Congress, DK Shivakumar miffed with 3 deputy CMs demand
dk shivkumar dycm karnataka congress
dk shivkumar dycm karnataka congress
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements