नेमकं झालं काय? Haldwani Violence
Haldwani violence : 4 killed; Uttarakhand on high alert : उत्तराखंड येथील हल्द्वानी शहरात गुरुवारी हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अवैधरित्या बांधण्यात आलेले मशिद आणि मदरसे तोडल्यानंतर येथील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलडोझर कारवाई करण्यात आल्याने पोलिस प्रशासनावर जोरदार दगडफेक करण्यात आली. तसचे यावेळी अनेक वाहने देखील पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला (demolition drive sparks tension in Haldwani – violence).
या घटनेत आतापर्यंत 4 जाणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, यामध्ये काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलिक के बगीचा येथील मदरसे व मशिदीवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. यानंतर मोठ्या प्रमाणात दगडपेक देखील करण्यात आली ज्यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी देखील झाले. यावळी पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला आणि अश्रूधूराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान हल्द्वानी मध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली (demolition drive Haldwani violence).
demolition drive Haldwani violence : हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर दुपारी दीड-दोन वाजता एसडीएम आणि महापालिका अधिकारी यांच्यासह पोलिसांचे पथक बेकायदेशीर मदरसे जमीनदोस्त करण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवल्यानंतर लगेचच काही लोकांनी दगडफेक सुरू केली. पोलिसांनी जमावाला शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल लाठीचार्ज केला.
पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर लोक अधिकच आक्रमक झाले. संध्याकाळपर्यंत हा गोंधळ सुरू होता. यादरम्यान पोलिसांनी बनभूलपुरा येथे आसरा घेतला. संध्याकाळी पाच वाजता पोलीस कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि पत्रकार बनभूलपुरा येथील पोलीस स्टेशनमध्ये होते. यानंतर लोकांनी दगडफेक करत फायर ब्रिगेड, पोलीस व्हॅनचे नुकसान केले.
demolition drive Haldwani violence : रात्री सात वाजता रामनगर, नैनीताल येथून अतिरीक्त पोलीस फोर्स बनभूलपुरा येथे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरूवात केली, मुख्यमंत्री सीएम पुष्कर धामी यांनी कर्फ्यू आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. माहितीनुसार या राड्यात 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेक गाड्या देखील जाळण्यात आल्या आहेत. दरम्यान सध्या येथील परिस्थीती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे. दरम्यान हिंसाचारग्रस्त बनभूलपुरामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि 100हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. राज्याचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था एपी अंशुमन यांनी यांनी याबद्दल माहिती दिली.
हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे झालेल्या हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून त्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती नैनिताल जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे. मोठ्या संख्येने पोलिस आणि पालिकेचे पथक गुरूवारी मलिक के बगीचे येथे पोहचले, येथे बेकायदेशीर मदरसे आणि नमाज स्थळ जेसीबीने जमीनदोस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. यानंतर महिला आणि तरुणांनी याचा विरोध करण्यास सुरूवात केली. यानंतर पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत एसडीएमसह अनेक पोलीस आणि प्रशासकिय कर्मचारी जखमी झाले आहेत.
demolition drive sparks tension in Haldwani violence
demolition drive Haldwani violence
demolition drive Haldwani violence
demolition drive Haldwani violence
demolition drive Haldwani violence
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements