क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 19 वर्षाखालील संघाचा कर्णदार डेव्हिड टीगेरची हकालपट्टी केली (David Teeger removed as South Africa captain for U-19 World Cup). त्याने इस्त्रायलचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या (comments in support of Israeli soldiers in the ongoing conflict with Palestine). CSA ने संघातील खेळाडू आणि खुद्द डेव्हिडला धोका असून सामन्यावेळी हिंसाचार होऊ शकतो असं सांगत त्याला कर्णधारपदावरून हटवलं.
यानंतर आता David Teeger (South Africa captain) ने प्रतिक्रिया दिली. तो म्हणला की, ‘मी 23 ऑक्टोबर 2023 ला केलेलं वक्तव्य हे इस्त्रायल सैनिकांच्या त्यांच्या नागरिकांचे संरक्षण करणे आणि हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची स्तुती करणारं होतं.’
मी माझं वक्तव्य हे वैयक्तिकरित्या केलं होतं. त्याचा मी ज्या संघाचे प्रतिनिधित्व करतोय त्याचा कोणताही संबंध नव्हता. मला माझं वक्तव्य अशा प्रकारे घेतले जाईल आणि तीव्र प्रतिक्रिया येतील असं वाटलं नव्हतं. तो माझा भाबडेपणा होता. डेव्हिड पुढे म्हणाला की, मी माझं वक्तव्य हे सहजरित्या केलं होतं. यापूर्वी मी कोणाचा सल्ला घेतला नाही याबाबत मला खेद आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की माझ्या वक्तव्याचा क्रिकेट साऊथ अफ्रिकेचा किंवा मी प्रतिनिधित्व करत असलेल्या कोणत्याही संघाचा काही संबंध नाही.
माझं इस्त्रायल संदर्भातील वक्तव्य हे नरसंहार किंवा वंशवादी द्वेश पसरवण्याचं समर्थन करत असा अर्थ काढला गेल्याचे वाचून मला खूप दुःख झालं. माथं वक्तव्य हे हे नरसंहार, युद्धातील गुन्हे किंवा माणुसकीच्या विरूद्ध नाहीये. दुसरीकडे अनेक लोकं आणि सरकारं विरूद्ध मताची आहेत हे मला मान्य आहे. यात दक्षिण आफ्रिका सरकारचा देखील समावेश आहे. आदरपूर्वक असहमती दर्शवणे हा आपल्या लोकशाही आणि घटनेचा एक मुलभूत पाया आहे. इस्त्रायल प्रकरणी माझ्या मताशी असहमती दर्शवण्याचा इतरांच्या आधिकाराचा आदर करतो.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका सरकारने इस्त्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्त्रायलवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे त्यांच्याच 19 वर्षाखालील राष्ट्रीय संघाचा कर्णधार हा इस्त्रायलचे समर्थन करताना दिसतोय.
David Teeger removed as South Africa captain for U-19 World Cup
David Teeger South Africa captain
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements