श्रीरामाच्या मंदिरासाठी 11 कोटी रुपयांचा मुकुट
प्रभू श्रीरामासाठी अनमोल मुकुट भेट देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ? किंमत ऐकाल तर..
अयोध्या : संपूर्ण देशाच्या आणि अयोध्येसाठी 22 जानेवारीचा दिवस ऐतिहासिक ठरला. रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाची औपचारिकरित्या स्थापना करण्यात आली आहे. सोमवार, 22 जानेवारीला हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच्या हस्ते झाला. त्यावेळी देशातील अनेक मान्यवर, उद्योगपती, सेलिब्रिटीही उपस्थित होते. सर्वांनी श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला. त्याचवेळी गुजरातमधील, सुरत येथील एका हिरे व्यावसायिकाने अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी 11 कोटी रुपयांचा मुकुट दान केला आहे. हा हिरे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह अयोध्या राम मंदिरात मुकुट दान करण्यासाठी पोहोचला होता.
खरंतर, सुरतमधील हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी त्यांच्या ग्रीन लॅब डायमंड कंपनीमध्ये प्रभू रामासाठी सोनं, हिरे आणि नीलमांनी जडलेला 6 किलो वजनाचा मुकुट तयार केला होता. तब्बल 11 कोटी रुपये किंमत असलेला हा मुकुट त्यांनी भक्तीभावाने प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केला (Gujarat diamond trader donates crown worth Rs 11 crore for Ram Lalla’s idol). हा मुकूट भेट देण्यासाठी हिरे उद्योगपती मुकेश पटेल अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधीच कुटुंबियांसह अयोध्येला पोहोचले. त्यानंतर 22 जानेवारी रोजी प्रभू रामसाठी तयार केलेला सोन्याचा-हिऱ्याचा हा मुकूट श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला अर्पण करण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार दिनेश भाई यांनी सांगितले की, ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश भाई पटेल यांनी अयोध्येच्या जगप्रसिद्ध नव्याने बांधलेल्या मंदिरात विराजमान होणार्या भगवान श्रीरामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता. कुटुंबातील सदस्य आणि कंपनीतील अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, त्यांनी सोन्याने आणि इतर दागिन्यांनी जडलेला मुकूट श्रीरामचरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रभू रामाच्या मूर्तीच्या मुकुटासाठी माप घेण्यासाठी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अयोध्येला पाठवण्यात आले होते. काटेकोरपणे मोजमाप घेऊन कंपनीचे कर्मचारी सुरतला आले. यानंतर मुकुट बनवण्याचे काम सुरू करण्यात आले.
6 किलो वजनाच्या या मुकुटात 4 किलो सोने वापरण्यात आले आहे. त्यानंतर हिरे, माणिक, मोती, नीलम अशा लहान-मोठ्या आकारांची रत्ने जडवण्यात आली. हे सर्व साहित्य वापरल्यानंतर अयोध्येतील जगप्रसिद्ध नवनिर्मित मंदिरात विराजमान प्रभू रामचंद्रांच्या मस्तकासाठी हा मुकूट भेट देण्यात आला. व्यापारी मुकेश पटेल यांनी अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे मंत्री चंपत राय जी, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक जी, महासचिव मिलन जी आणि दिनेश नावडिया यांच्या उपस्थितीत 11 कोटी रुपयांचा मुकुट अर्पण केला.
crown Rs 11 crore for Ram Lalla Ayodhya
crown Rs 11 crore for Ram Lalla Ayodhya
crown Rs 11 crore for Ram Lalla Ayodhya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements