आग्रा येथील 12 हुन अधिक विभागातील रहिवाशांनी अलीकडेच भगवान शर्मा व उमा देवी यांच्या लग्नाचा सोहळा साजरा केला. एरवी लग्नाचा मंडप सजवण्यासाठी जोडपी लाखो रुपये खर्च करतात पण भगवान व उमा यांनी निवडलेले लग्नाचं ठिकाण पाहून सर्वांनाच धक्का बसला. या उभयतांनी चक्क कचऱ्याने काठोकाठ भरलेल्या गटाराच्या शेजारी उभे राहून लग्न केले. खरंतर हे त्यांचं लग्न म्हणजे त्यांनी लग्नाच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकमेकांच्या गळ्यात हार घालून केलेलं सेलिब्रेशन होतं. दोघांनी यापूर्वी आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीव किंवा लक्षद्वीपला जाण्याचं ठरवलं होतं पण तो प्लॅन रद्द करून त्यांनी गटाराजवळ एकमेकांच्या गळ्यात हार घातला (Couple weds near drain to protest filth in Agra).
स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या जोडप्याने हातात पोस्टर घेऊन फोटो सुद्धा काढले होते. या माध्यमातून ‘गलिच्छ पाणी, खराब रस्ते आणि परिसराची एकूण स्वच्छता’ या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा त्यांचा हेतू होता. जोपर्यंत गटारांची स्वच्छता होत नाही, सांडपाण्याचे नियोजन होत नाही तोपर्यंत मत देणार नाही अशा आशयाचे पोस्टर या जोडप्याने हातात धरले होते. भविष्यात सुद्धा जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत सगळे सण- उत्सव असेच साजरे केले जातील असेही त्यांनी सांगितले आहे.
रविवारी, उमा देवी एका ब्युटी पार्लरमध्ये गेल्या, नव्या नवरीसारखे कपडे घालून कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. तिचे पती भगवान शर्मा, सुद्धा नवरदेवाचे कपडे घालून वऱ्हाड्यांसह लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. इथे एका पुजाऱ्याने मंत्रोच्चार करत विधी पार पाडल्या व मग जोडप्याने एकमेकांना पुष्पहार घातला. त्यानंतर आलेल्या ‘पाहुण्यांनी’ चिखल आणि दुर्गंधीयुक्त रस्त्यावर उभे राहून जेवणाचा आनंद घेतला. त्यांच्या हातात ‘गटारे नाही, मत नाही… रस्ते नाही, मत नाही’ असे फलक होते. या ठिकाणीच मेजवानीही आयोजित करण्यात आली होती.
भगवान शर्मा यांनी आपल्या या अनोख्या लग्नाविषयी माहिती देताना सांगितले की, “आम्हाला स्थानिक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आमचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आम्ही अशाप्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आता तरी काहीतरी केले पाहिजे. सुरुवातीला लग्नाचा वाढदिवस लक्षद्वीप किंवा मालदीवमध्ये साजरा करण्याचा आमचा प्लॅन होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे, त्यांच्या भागातील अपुऱ्या गटार आणि कचऱ्याची विल्हेवाट लागली जात नाहीये. 10 हजार ते 12 हजार लोकसंख्या असलेल्या नागला काळी, राजराई, सेमरी येथील रहिवासी खराब रस्ते आणि गटाराच्या समस्येने त्रस्त आहेत हे पाहून आम्ही असे आंदोलन करण्याचे ठरवले. “
दरम्यान, यानंतर डीएम भानू चंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, आम्ही रहिवाशांनी ठळकपणे मांडलेल्या समस्यांची दखल घेतली आहे. जमिनीच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्यासाठी एका टीमला काम सोपवण्यात आले आहे. स्थितीच्या अहवालानुसार, त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल.
Couple weds near drain to protest filth in Agra
Couple weds near drain to protest filth in Agra
Couple weds near drain to protest filth in Agra
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements