‘या’ नेत्याला CM पदाची ऑफर
…तर आम्ही त्यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवू
बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमारांनी भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एनडीएच सरकार स्थापन झाले. मात्र बिहारमधील कुरघोडीच्या या राजकारणात विधानसभेतील बहुमत चाचणीच्या आकड्यांचा खेळ अजून बाकी आहे. त्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी काँग्रेसकडून आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
गेल्याच आठवड्यात संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांसोबत असलेल्या महाआघाडीतून काढता पाय घेतला. त्यानंतर लगेचच 28 जानेवारीला भाजप सोबत हातमिळवणी करून बिहारमध्ये एनडीए सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या 2 आमदारांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा हा पक्ष देखील सहभागी आहे.
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मांझी यांनी आता आपल्या 4 आमदार असलेल्या HAM पक्षाला दोन मंत्री पदे देण्याची मागणी केली आहे. जीतनराम मांझी यांच्याकडून एनडीएवर दबावतंत्र वापरले जात असतानाच दुसरीकडे काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी यांनी जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. जर जीतनराम मांझी आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवू, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बिहारच्या सरकारची बहुमत चाचणी पूर्ण होण्याआधीच काँग्रेसच्या या नवीन ऑफरमुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
जीतनराम मांझी यांना काँग्रेसकडून मिळालेल्या या ऑफरचा वापर करून एनडीए सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मला महाआघाडीकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे. परंतु मी ती स्वीकारलेली नाही. तसेच एनडीए सरकारमध्ये अपक्ष आमदारांना मागेल ती पदे मिळत असताना आमच्या पक्षाला दोन मंत्रिपदं मिळाली नाही तर आमच्यावर अन्याय होईल. या प्रकरणी मी गृहमंत्री अमित शाह आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली असल्याचेही मांझी म्हणाले आहेत.
दरम्यान, नितीश कुमार यांच्यासोबत 8 जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन यांचा देखील समावेश आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच मांझी यांनी आणखी दोन मंत्रिपदाची मागणी करत सरकारवर दबाव निर्माण केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर राजदचे प्रवक्त मृत्युंजय तिवारी यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, राजकारणात सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. मात्र तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) हे धक्का तंत्रासाठी ओळखले जातात, त्यांनी यापूर्वीच खेळ अजून संपला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात बिहारच्या राजकारणात आणखी नवा अध्याय पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Congress offered Jitan Ram Manjhi CM in Bihar
Congress offered Jitan Ram Manjhi CM in Bihar
Congress offered Jitan Ram Manjhi CM in Bihar
Congress offered Jitan Ram Manjhi CM in Bihar
Congress offered Jitan Ram Manjhi CM in Bihar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements