बर्याच वेळा लोक दावा करतात की त्यांच्या कंपनीने लोकांच्या कामात अनावश्यक चुका दाखवून त्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली किंवा काही कारणास्तव त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला जेणेकरून त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा. पण चीनच्या शांक्सी प्रांतातील एका कंपनीबाबत जो दावा केला जात आहे, तो त्याहूनही आश्चर्यकारक आहे (Chinese company cheats workers by moving to remote town, returning 4 days later)
शिआन शहरातील एका जाहिरात कंपनीने आपले ऑफिस ग्रामीण डोंगराळ भागात शिफ्ट केले आहे. कंपनी सोडून गेलेल्या माजी कर्मचाऱ्यांच्या आरोपानुसार, कर्मचारी नाराज होऊन स्वत:च नोकरी सोडून जावेत आणि त्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागू नये म्हणून हे सर्व करण्यात आले. चांग नावाच्या एका माणसाने सांगितले की कंपनीने त्याला सांगितले की त्याला क्विनलिंग माउंटनमधील (Qinling Mountain) नवीन ऑफिसमध्ये दररोज प्रवास करावा लागेल. जायला किमान दोन तास लागतील. ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही त्यांना आणखी त्रास सहन करावा लागतो कारण या भागात पब्लिक ट्रांसपोर्ट फारच मर्यादित आहे (Xian-based advertising company in central China’s Shaanxi province).
चांग म्हणाले, ‘ऑफिसचे लोकेशन बदलले असल्याने, स्वत:च्या वाहनाशिवाय कर्मचाऱ्यांना दर तीन तासांनी येणाऱ्या बसवर अवलंबून राहावे लागायचे आणि त्यानंतर ऑफिसला जाण्यासाठी डोंगराळ रस्त्यांवरून तीन किलोमीटर चालत जावे लागत होते.’ ते म्हणाले की जवळच्या रेल्वे स्टेशनवरून टॅक्सीचे भाडे सुमारे 60 युआन ($8- रु. 663) होते आणि कंपनीने वाहतूक शुल्क भरण्यास नकार दिला होता.
नवीन लोकेशन केवळ दूरच नव्हते, तर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी जवळच्या गावात जावे लागायचे. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्याही जास्त होती, ज्याची सगळ्यांना भीती वाटत होती. विशेषत: अंधार पडल्यानंतर. मात्र कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी करूनही मॅनेजमेंटने काहीही करण्यास नकार दिला. परिणामी 20 पैकी 14 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. पण दाव्यानुसार, विचित्र म्हणजे राजीनामे दिल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी कंपनी पुन्हा शहरात शिफ्ट करण्यात आली आणि नवीन कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला.
आता राजीनामा दिलेले कर्मचारी त्यांच्या एक्स बॉसने त्यांना कोणतीही भरपाई न देता नोकरी सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत आहेत. ही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर, जाहिरात कंपनीनेही या दाव्यांचे खंडन केले. कंपनीची इमेज खराब करण्यासाठी माजी कर्मचाऱ्यांवर खटला भरण्याची धमकी दिली आहे. शहरातील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये भाडे जास्त असल्याने नवीन कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आम्ही एक होमस्टे देखील चालवत होतो, म्हणून आम्ही तिथे तात्पुरते एक आठवड्यासाठी गेलो आणि दुसरे काही नाही. मात्र, कंपनी वर्षभर डोंगरातील ऑफिसमध्येच काम करेल, असे त्यांना सांगण्यात आल्याचे माजी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
company cheats workers by moving to remote town Qinling Mountains
company cheats workers by moving to remote town
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements