माझी घोर फसवणूक झाली आहे, असं म्हणत जजाब
कॉमेडियन कपिल शर्मा हा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून तो लोकांना खळखळून हसवतो. पण आता कपिल शर्मा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कपिल शर्माची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीविरोधात कपिल शर्मा थेट ईडीच्या कार्यालयात पोहोचला आहे (Comedian Kapil Sharma appears at ED office). तिथे जात कपिलने तक्रार दाखल केली आहे. कार डिझायनर दिलीप छाबडिया यांच्या विरोधात कपिलने तक्रार केली आहे (Kapil Sharma Cheating Case : Comedian Accuses Car Designer Dilip Chhabria of Illegal Money Extraction).
दिलीप छाबडिया यांनी दिलेल्या वेळेत आपली व्हॅनिटी व्हॅन दिली नाही, असं कपिलचं म्हणणं आहे. दिलीप छाबडिया यांच्या विरोधात कपिल शर्माने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. कार डिझायनर दिलीप छाबडिया यांच्याकडून कपिल शर्माला एक व्हॅनिटी व्हॅन तयार करून घ्यायची होती. तसं या दोघांमध्ये बोलणं झालं. पण आता छाबडिया यांच्याकडून व्हॅनिटी मिळत नसल्याची कपिलची तक्रार आहे. छाबडिया यांच्या विरोधात कपिलने चार्टशीट दाखल केली आहे. ईडीचे अधिकारी मोहम्मद हामिद यांच्याकडे कपीलने आपला जबाब नोंदवला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने (बुधवार) आरोपपत्राची दखल घेतली. त्यानुसार दिलीप छाबडिया यांच्यासोबत इतर 6 आरोपींना समन्स बजावलं आहे. 26 फेब्रुवारीला या सगळ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कपिल शर्माचं म्हणणं काय आहे? : कॉमेडियन कपिल शर्माची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी थेट ईडी कार्यालयात जात कपिलने तक्रार दाखल केली आहे. छाबडिया यांनी व्हॅनिटीची डिलीवरी दिली नाही. शिवाय या दिरंगाईला मलाच जबाबदार आहे, असं छाबडिया यांचं म्हणणं आहे. शिवाय दिलीप छाबडिया यांनी माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, असं कपिल शर्मा याचं म्हणणं आहे. व्हॅनिटी व्हॅन बनवण्यासाठी 2016 ला मी दिलीप छाबडिया यांच्याशी संपर्क केला. 2017 ला K9 प्रॉडक्शन आणि दिलीप छाबडिया डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड (DCDPL) यांच्यात व्हॅनिटी व्हॅनसाठी 4.5 कोटींचा करार झाला. कपिल शर्माकडून दिलीप छाबडिया यांना 5.31 कोटी रुपये देण्यात आले. मात्र ना ही कार मिळाली. ना ही पैसे परत मिळाले, अशी तक्रार कपिलने ईडीकडे केली आहे.
Comedian Kapil Sharma appears at ED office
Comedian Kapil Sharma appears at ED office
Comedian Kapil Sharma appears at ED office
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements