हॉटेल कर्मचाऱ्याची हुशारी, कॅब चालकाचा धूर्तपणा;
एआय एक्सपर्टने केलेल्या मुलाच्या हत्येतील इनसाईड स्टोरी
पतीला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने कर्नाटकातील आर्टिफिशयल इंटेलिजेंस कंपनीची सीईओ असणाऱ्या आईने टोकाचे पाऊल उचलत आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केला. सूचना सेठ (वय 37, रा. बंगळुरू) असे या महिलेचे नाव असून ती माइंडफुल एआय लॅबची संस्थापक आहे. आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या व हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे गोव्यासह राष्ट्रीय पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाळाला संपवल्यानंतर तिने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. अधिकृतरित्या मात्र हे स्पष्ट झालेलं नाही. सिकेरी-कांदोळी येथील हॉटेलचा स्टाफ, गोवा पोलिसांची सतर्कता व टॅक्सी चालकामुळे या खुनाचा छडा लागला, आपल्या 4 वर्षाच्या बाळाला मारण्यासाठी आरोपी महिलेने उशीचा वापर केल्याची शक्यता आहे. शवचिकित्सा अहवातून हे स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोस्टमार्टमनंतर डॉ. कुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचा गळा दाबल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. त्यासाठी तिने उशी वापरली असावी. मुलाच्या मृत्यूला 36 तासांपेक्षा जास्त काळ झाला आहे. दुखापतीच्या किंवा झटापटीच्या खुणा नाहीत. ही सर्व गळा दाबण्याची चिन्हे आहेत. अंदाजे 36 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. गळा दाबल्यानंतर श्वास कोंढला गेल्यामुळे रक्तस्त्राव झाला आहे आणि नाकाला सूज आली आहे. शरीरावर ओरखड्याच्या खुणाही नाहीत, असे निरीक्षण डॉक्टरच्या पथकाने नोंदवलं आहे.
सूचना व पती व्यंकटरमन यांचा 2010 मध्ये विवाह झाला, 2019 मध्ये त्यांना मुलगा झाला. मात्र, मुलगा झाल्यानंतर एका वर्षातच म्हणजे 2020 मध्ये त्या दोघात वाद सुरू झाले. त्यांचे भांडण कोर्टात गेले व दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, कोर्टाने वडिलांना दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, कोर्टाचा निर्णय सूचनाला पटला नव्हता. पती व्यंकटरमन याने मुलाला भेटूच नये, असे तिला वाटत होते. त्यासाठी तिने प्लॅन केला आणि पोटच्या मुलाला कायमचे संपवले. सोमवारी सुटकेसमध्ये मृतदेह घालून ती पुन्हा बंगळुरुच्या दिशेने टॅक्सीद्वारे निघाली.
निघताना महिलेसोबत मुलगा नसल्याचे पाहून रिसॉर्टमधील रूमबॉयला संशय आला, थोड्या वेळाने तो रूममध्ये गेला असता त्याला रक्ताचे डाग दिसले. त्याने तत्काळ व्यवस्थापकाला माहिती दिली असता त्यानेही वेळ न दवडता पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत सूचना ज्या टॅक्सीने गेली त्या टॅक्सीचालकाच्या मदतीने तिला चित्रदुर्गजवळील एलमंगला पोलिसांनी तिला अटक केली.
What led Bengaluru woman CEO to kill her son, Goa Police reveal murder intent
How did Bengaluru CEO Suchana Seth’s son die? Postmortem report reveals details. ceo ai killed son goa karnataka
Suchana Seth case: Bengaluru CEO smothered 4-yr-old son to death
ceo ai killed son goa karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements