प्रेयसीच्या वाढदिवशीच तिला लॉजवर नेलं अन् हत्या केली, नेमकं काय घडलं?
खैरणे एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना
मुंबई : क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रेम प्रकरण, त्यात भांडण आणि मग त्या रागात एखाद्याचा जीव घ्यायचा. अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडली आहे. जिथे वाढदिवस एका मुलीसाठी तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. खैरणे एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खैरणे येथील आश्वी लॉजिंगमध्ये आरोपी शोएब शेख (वय 24) या तरुणाने आपली प्रेयसी अॅमी उर्फ अमित सिंगची (वय 35) हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी हा साकीनाका परिसरात वास्तव्यास असून अमित कौर ही जुईनगर मधील खाजगी बँकेत मॅनेजर पदावर नोकरीला होती.
शोएब आणि अमित यांची तीन महिन्यापूर्वीच ओळख झाली होती. शोएब हा 24 वर्षांचा असून त्याची प्रेयसी अमित कौर त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी होती. अमित कौरचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी देखील आहे. शोएबला अमित कौर हिचे अन्य पुरुषांशी प्रेम संबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरून अमित कौर हिच्या वाढदिवशी पार्टी झाल्यानंतर शोएबने अमित कौरची हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता.
त्यानुसार शोएबने अमित कौरची हत्या केली. हत्येनंतर शोएब हा आपल्या राहत्या घरी गेला. मात्र त्याच्या हालचालीवर एका व्यक्तीला संशय आल्याने त्याने पोलिसांना याची माहिती दिली. साकीनाका पोलिसांनी शोएबला ताब्यात घेत चौकशी केली असता सर्व घटना समोर आली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तुर्भे पोलीसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी तुर्भे पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहे. तसेच हत्याच नेमकं कारण काय आहे, याचा शोधही पोलीस घेत आहे.
Boyfriend Killed Girlfriend Birthday
Boyfriend Killed Girlfriend Birthday Kopar Khairane MIDC
Boyfriend Killed Girlfriend Birthday Kopar Khairane MIDC
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements