‘या’ नेत्यांची उमेदवारी धोक्यात?
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजप नवा फॉर्म्युला राबवणाराय. त्यानुसार 70 पेक्षा अधिक वय असलेल्या आणि 3 टर्म खासदार असलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असा फॉर्म्युला कर्नाटक भाजपनं सुचवला होता. कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे 25 खासदार आहेत. हा फॉर्म्युला लागू केल्यास 25 पैकी 11 विद्यमान खासदारांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्यासह जी. एम. सिद्धेश्वर, रमेश जिगजिगानी, बी. एन. बच्चे गौडा, मंगल अंगडी (बेळगाव), जी. एस. बसवराज, व्ही. श्रीनिवास प्रसाद, वाय. देवेंद्रप्पा आदींचा समावेश असल्याचं समजतंय.
भाजपचा हा फॉर्म्युला केवळ कर्नाटकपुरता मर्यादित नसेल. तर महाराष्ट्रासह देशभरात लागू करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. तसं झाल्यास महाराष्ट्रातून दोघा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची भीती आहे. माजी मंत्री सुभाष भामरे आणि रामदास तडस यांचं वय 70 आहे. त्यामुळं हा फॉर्म्युला राबवल्यास भामरे आणि तडस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वतःहून निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. 70 पेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकीट नाकारण्याची चर्चा त्यावेळीही भाजपात होती. आता पुन्हा एकदा तशीच शक्यता आहे.
दरम्यान, याआधी वयाची सत्तरी पार केलेल्या बड्या नेत्यांची रवानगी भाजपनं मार्गदर्शक मंडळात केलीय. आता खासदारकीसाठीही हाच निकष लावला जाणार असल्याची चर्चा आहे. हा फॉर्म्युला फायनल झाल्यास राजकारणातून बडे नेते कायमचे रिटायर होतील. (BJP Formula for Loksabha Election Candidate in 2024)
BJP Formula for Loksabha Election
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310