₹ 8.20 लाख गमावले; FIR दाखल @कर्नाटक
प्रेम आंधळं असतं, प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचा प्रत्यय देणारी अनेक उदाहरणं समाजात आहेत. प्रेमात ब्रेकअप झाल्यावर तर त्या धक्क्यातून सावरणं म्हणजे अनेकांसाठी कठीण काम असते. किंबहुना अनेकांना यातून सावरता न आल्यानं ते धाडसी निर्णय घेतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. प्रियकर सोडून गेल्यानंतर उद्विग्न झालेल्या तरूणीनं त्याला मिळवण्यासाठी काळी जादू केली पण तब्बल 8.20 लाख रूपये गमावले (Bengaluru girl loses Rs 8.2 lakh after using ‘black magic’ to reconcile with ex-boyfriend).
कर्नाटकातील बंगळुरूतील जलाहल्ली येथील 25 वर्षीय राहिला (बदलेलं नाव) या तरूणीला तिच्या पहिल्या प्रियकराला मिळवायचं होतं. या निराशेत तिने एक भन्नाट मार्ग आजमावला… पण तिला ₹ 8.20 लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले. माहितीनुसार, प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राहिलाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिची ओळख सोशल मीडियाद्वारे अहमद नावाच्या एका ‘बाबा’शी झाली.
राहिलाने 9 डिसेंबर रोजी अहमद या बाबाशी ऑनलाइन संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की, तुझा पहिला प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी तुझ्यावर काळी जादू केली आहे. ज्यामुळे तुला तुझ्या आयुष्यात समस्या येत आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी बाबाने काही युक्त्या सांगितल्या, त्यासाठी त्याने 501 रुपयांची मागणी केली.
प्रियकरावर काळी जादू करण्यासाठी 2.4 लाख मागितले : बाबाने युक्ती सांगताच राहिलाने त्याला प्रथम 501 रूपये ऑनलाइन ट्रान्सफर केले, त्यानंतर अहमदने राहिलाला तिचे, तिच्या प्रियकराचे आणि कुटुंबाचे फोटो मागवले. संबंधित बाबा म्हणजेच अहमदने राहिलाला सांगितले की, जर तिने 2.4 लाख रुपये दिले तर तो तिच्या पहिल्या प्रियकरावर आणि त्याच्या कुटुंबावर काळी जादू करू शकतो. या जादूनंतर कोणीही तुमच्या नात्याच्या विरोधात जाणार नाही, असेही त्याने सांगितले.
दरम्यान, पीडित राहिला अहमदच्या शब्दांना एवढी बळी पडली की, तिने 22 डिसेंबर रोजी कर्ज काढून त्याला 2.4 लाख रुपये दिले. मग काही दिवसांनी अहमदने तिच्याकडे आणखी 1.7 लाख रुपयांची मागणी केली. सातत्याने पैशांची मागणी केल्याने राहिलाला संशय आला आणि तिने अहमदला पैसे देण्यास नकार दिला. राहिलाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अहमदने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. कारण अहमदने गोड बोलून राहिलाकडून तिच्या पहिल्या प्रियकरासोबतचे फोटो घेतले होते. अहमदच्या या धमकीला बळी पडत राहिलाने 4.1 लाख रूपये दिले.
फसवणूक झाल्याची माहिती राहिलाने पालकांना दिली. यानंतर घरच्यांनी तिला पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर राहिलाने जलाहल्ली पोलीस स्थानकात जाऊन एफआयआर दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अहमदने हे सर्व पैसे त्याचा सहकारी लियाखतुल्लाहच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. अहमदने सांगितले की, राहिलाने त्याला काळी जादू करण्यास भाग पाडले आणि तो लवकरच तिचे पैसे परत करणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सध्या अहमदचा फोन बंद आहे. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
Bengaluru girl lost Rs 8 lakh black magic boyfriend
Bengaluru girl lost Rs 8 lakh black magic boyfriend
Bengaluru girl lost Rs 8 lakh black magic boyfriend
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements