बेळगाव—belgavkar : निपाणी : निपाणी मतदारसंघात निपाणी आणि बोरगाव या ठिकाणी इंदिरा कॅन्टीनला मंजुरी मिळाली आहे. निपाणी शहरासाठी आणखी एका इंदिरा कॅन्टीनची मागणी आपण केली आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती माजी आ. काकासाहेब पाटील यांनी दिली. रविवारी साखरवाडी येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
माजी आ. पाटील म्हणाले, इंदिरा कॅन्टीन योजना 2018 मध्ये तत्कालीन कुमारस्वामी-भाजप सरकारने रद्द केली होती. मात्र आता काँग्रेसची सत्ता आहे. सर्वसामान्य मजूरव नागरिकांची अडचण लक्षात घेऊन इंदिरा कॅन्टीन योजनेला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
मंत्री. रामलिंगा रेड्डी व भैरती सुरेश यांची भेट घेऊन निपाणी शहरात दोन स्वतंत्र इंदिरा कॅन्टीनची मागणी केली आहे. मंजुरी मिळालेले एक कॅन्टीन बसस्थानक परिसरात सुरू होणार आहे. दुसऱ्या इंदिरा कॅन्टीनला लोकमान्य टिळक उद्यान परिसराची जागा सुचवली आहे. राज्य सरकारने राज्यभरात आतापर्यंत 46 ठिकाणी कॅन्टीनला मंजुरी दिली असल्याचेही माजी आ. काकासाहेब पाटील यांनी सांगितले. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, निपाणी भाग काँग्रेस माजी अध्यक्ष गोपाळ नाईक आदी उपस्थित होते.
Belgaum two Indira Canteens in Nipani belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum two Indira Canteens in Nipani
Belgaum two Indira Canteens in Nipani
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements