ब्लॅकमेल करून धमकावले होते. त्यामुळे
बेळगाव—belgavkar : निपाणी शहराबाहेरील एका लॉजच्या तिसरा मजल्यावरून पडून शुक्रवारी (12 जानेवारी) कर्मचारी किरण गणपती भिर्डेकर (वय 46, रा. भीमनगर, तिसरी गल्ली, निपाणी) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी यापूर्वी बाळाप्पा गुडगेनहट्टी (वय 25, रा. जोडीहाळ, बंबरगा ता. बेळगाव) व नितेश कित्तुर (वय 28, रा. वैभवनगर-बेळगाव) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी जोन्सकुमार मारुती कऱ्याप्पगोळ (वय 32, रा. बैरनटी ता. मुडलगी जि. बेळगाव, सध्या रा. अंजनेयनगर बेळगाव) याला अटक केली.
यापूर्वी अटक केलेल्या बाळाप्पा व नितेश यांच्यासमवेत जोन्सकुमार हा घटनास्थळी हजर होता. या तिघांनी मयत किरणला ब्लॅकमेल करून धमकावले होते. त्यामुळे किरण याने घाबरून लॉजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी ही कारवाई केली. जोन्सकुमार याला निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता त्याची बेळगावच्या हिंडलगा कारागृहात रवानगी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, मयत किरण हा लॉजवर कर्मचारी होता. याप्रकरणी निपाणी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघांनी आपण मोबाईलवर लॉजमधील शूटिंग करीत किरणला ब्लॅकमेलिंग करीत धमकावल्याची कबुली दिली. किरण याने घाबरून लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने जागीच मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून अटक केले. पुढील तपास मंडल पोलिस निरीक्षक तळवार हे करीत आहेत. निपाणी शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Nipani Lodge Worker Dies Three Arrested belgavkar Belgaum belgav belagavi belgaum. Belgaum Nipani Lodge Worker Dies Three Arrested
Belgaum Nipani Lodge Worker Dies Three Arrested
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements